IMPIMP

Deepak Kesarkar | दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘उद्धवजींचा नको, अनिल परबांचा फोन तपासा सगळे उघड होईल’

by nagesh
Deepak Kesarkar | deepak kesarkar big claim about phone call to devendra fadnavis said check anil parab phone everything will be revealed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बंडखोरीनंतर पक्ष सावरण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी निष्ठा यात्रेनंतर आता राज्यात शिवसंवाद यात्रा (Shiv Sampark Campaign) सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, भिवंडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सर्व बंडखोरांवर (Rebel MLA) आदित्य यांनी आक्रमक होत हल्लाबोल केला. आज ते नाशिकमध्ये असणार आहेत. दरम्यान, शिंदे गट (Shinde Group) अलर्ट झाला असून आदित्य ठाकरे यांना अडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आदित्य यांनी केलेल्या आरोपांना आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबतही गौप्यस्फोट केला आहे. दीपक केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या सोबत दादा भुसे (Dada Bhuse), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) उपस्थित होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, तुम्ही अजून लहान आहात आणि प्रादेशिक अस्मिता काय असते हे तुम्हाला ठावूक नाही. त्यामुळे आम्ही हाडाचे शिवसैनिक (Shiv Sainik) असून टीका करताना जरा विचार करुन बोला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) केलेल्या फोनसंदर्भात एक गौप्यस्फोट केला. तुम्ही शिंदेंना बाजूला ठेवा आम्ही भाजपासोबत (BJP) सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहोत, अशी बातमी माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली होती. या वृत्ताला दीपक केसरकर यांनी दुजोरा दिला.

 

केसरकर म्हणाले, मी मीडियामध्ये बातमी वाचली की उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता. त्यांनी शिंदेंना बाजूला ठेवा मी स्वत: तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करु, असे म्हटले होते. म्हणजे तुमच्या पक्षामध्ये जे नंबर दोनचे नेते आहेत आणि जे तुमचा आदर करतात तुम्ही त्यांच्याच बाबत जर असे करत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाचे काय होईल?

 

केसरकर पुढे म्हणाले, आता या बातमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले की हे खोटे आहे.
जर हे खोटे असेल तर तुम्ही अनिल परबांचा (Anil Parab) फोन तपासून पहा.
त्यातून जर फडणवीसांना फोन गेला असेल तर निश्चितपणे हे घडले असेल असे मला वाटते.
कारण कधी उद्धव ठाकरेंचे फोन हे त्यांच्या फोनवरुन जात नाहीत.
अनिल परबांच्या फोनवरुन जातात. त्यामुळे त्यांचा फोन तपासा मग स्पष्टीकरण द्या, असे केसरकर म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस
यांना फोन करुन शिंदे यांना बाजूला करा आम्ही युतीसाठी तयार आहोत
असा प्रस्ताव दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर शिवसेनेने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले.
पक्षाचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान (Harshal Pradhan) यांनी अशापद्धतीचा कोणताही फोन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केला नव्हता, असे स्पष्टपणे सांगितले होते.

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar big claim about phone call to devendra fadnavis said check anil parab phone everything will be revealed

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | आदित्य ठाकरेंच्या ठाणे-भिवंडीतील आव्हानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट! संध्याकाळीच घडवला समर्थकांचा प्रवेश

Yogasana For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज करावी ही 2 योगासन

Deepak Kesarkar | केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘जरा आपल्या…’

 

Related Posts