IMPIMP

Maharashtra Political Crisis | आदित्य ठाकरेंच्या ठाणे-भिवंडीतील आव्हानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट! संध्याकाळीच घडवला समर्थकांचा प्रवेश

by nagesh
 Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | aaditya thackeray says people dont go to eknath shinde rally

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी पक्षातील बंडानंतर शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्याशी ठिकठिकाणी जाऊन संवाद साधण्याचा सपाटा लावला आहे. कालच शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Sampark Campaign) माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेते (Rebel Leader) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे आणि भिवंडी या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना जोरदार आव्हान (Maharashtra Political Crisis) देत हल्लाबोल केला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिंदे गट अ‍ॅक्शन मोडमध्ये
यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली. यानंतर शिंदे गट (Shinde Group) अ‍ॅक्शन मोडमध्ये आला असून सकाळी आदित्य ठाकरे यांची सभा झाल्यानंतर (Maharashtra Political Crisis) सायंकाळी भिवंडीत काही शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणण्यात आला. आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा (Nishta Yatra) आणि शिव संवाद यात्रा (Shiva Samvad Yatra) शिंदे गटाला धक्का बसू लागल्याचे यावरून दिसत आहे.

 

आदित्य यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न
आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत रॅली काढून सभा घेतली. त्यांनी भिवंडीत एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर हल्लाबोल केला होता. आक्रमक झालेल्या आदित्य यांच्या भाषणाने स्थानिक शिवसैनिकांमध्ये जोष दिसून येत होता. यामुळे अलर्ट झालेल्या शिंदे गटाने तातडीने हालचाली करून भिवंडीत आपल्या समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणत, आदित्य यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी केले ट्विट
आदित्य ठाकरे यांचे आक्रमक भाषण, आणि सभेची दखल शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही घ्यावी लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट करून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील काही शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला (Alliance Government) जाहीर पाठींबा दर्शविला, अशी माहिती दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आदित्य यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला
ठाकरे यांनी, भिवंडीत एकनाथ शिंदे यांचे नाव घेता थेट हल्लाबोल केला होता.
हे बंडखोर नव्हे, गद्दरच आहेत असे सांगत आदित्य म्हणाले,
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर एका आठवड्यात एक नव्हे, तर दोन शस्त्रक्रिया झाल्या.
उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर बेडवरून हलू शकत नाहीत,
ही माहिती ज्या मिनिटाला कळाली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री होऊ शकतो
का, याची चाचपणी सुरु केली. आपल्यासोबत कोण येईल किंवा नाही, यादृष्टीने त्यांनी आमदारांची जमवाजमव सुरु केली.
या गद्दारांची ही माणसुकी आहे, असा घणाघात आदित्य यांनी केला होता.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | in the morning aaditya thackeray visits and in evening shivsainik left shiv sena to join eknath shinde group

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘जरा आपल्या…’

Yogasana For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज करावी ही 2 योगासन
Habit Of Smartphones | जर तुम्हाला असेल वारंवार फोन पाहण्याची सवय तर व्हा सावध, ठरू शकते घातक!

 

Related Posts