IMPIMP

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

by nagesh
Deepak Kesarkar | Draft of Marathi language policy submitted to the government; Marathi Language Minister Deepak Kesarkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Deepak Kesarkar | महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 2023 चा अंतिम मसूदा आज भाषा सल्लागार समितीने
शासनास सादर केला आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (Laxmikant Deshmukh)
यांनी हा अहवाल सादर केला. (Deepak Kesarkar)

 

मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षणात, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण तयार
करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने हा मसुदा तयार केला असून हे धोरण शासनातर्फे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री
दीपक केसरकर यांनी दिली. (Deepak Kesarkar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मराठी भाषा धोरणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून मराठी भाषा अधिक लोकाभिमुख, रोजगाराभिमुख व्हावी यासाठी समितीने सूचना केल्या असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली.
या समितीला इतर अनेक महत्वाच्या कामांसोबत महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील ’25 वर्षांचे मराठी भाषा धोरण ठरवणे’ हे काम अग्रक्रमाने करण्याचे निदेश दिले आहेत. हे धोरण सर्वंकष स्वरुपाचे व सर्व स्तरांवरील लोकव्यवहार, ज्ञान-अर्थ-प्रशासन आणि संवाद – संपर्क आणि अभिसरणासाठी उपयुक्त असेल असा विश्वास समितीने धोरणाच्या प्रास्ताविकेत व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Deepak Kesarkar | Draft of Marathi language policy submitted to the government; Marathi Language Minister Deepak Kesarkar

 

हे देखील वाचा :

Pune PMC Employees – 7th Pay Commission | सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Ajit Pawar | सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरलेत, अजित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

Palkhi Mahamarg | पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत; खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

National Lok Adalat At Manchar (Pune) | जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे 11 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 

Related Posts