IMPIMP

Ajit Pawar | सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरलेत, अजित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

by nagesh
 Ajit Pawar | corruption in shinde fadnavis government allegations by ajit pawar

सातारा :  सरकारसत्ता ऑनलाईन  विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची
चर्चा राजकीय वर्तुळात होती. या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-
Fadnavis Government) गंभीर आरोप केला आहे. राज्यात भ्रष्टाचार (Corruption) बोकाळला असून बदल्यांचे रेट (Transfers) ठरल्याचा आरोप
अजित पवारांनी (Ajit Pawar) केला आहे. ते सातारा येथील कार्यक्रमात बोलत होते.

 

कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तसेच कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ व कोरेगाव तालुका खादी ग्रामउद्योग संस्थांमधील नवीन संचालकांचा सत्कार आज (सोमवार) आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी कोरेगाव येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले, आत्ताच्या सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरले आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सत्तेत आम्ही होतो पण सत्तेचा माज आम्ही केला नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. आत्ताचे मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं कामं करुन देण्यासाठी मार्केटमध्ये फिरत आहेत, असा गंभीर आरोप (Allegation) अजित पवारांनी केला.

 

अजित पवार पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा माज चढला आहे.
केवळ ठराविक आमदारांना सांभाळायचं चालले आहे.
निधी देताना मुद्दाम आडकाठी आणली जाते. सरकारचे मंत्री कोणाला विचारत नाहीत.
मंत्रिमंडळात बसत नाहीत. काही जणांकडून घाणेरडे शब्द वापरले जातात.
हे सर्व पाहून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Late Yashwantrao Chavan) साहेबांच्या डोळ्यात पाणी येत असेल असेही अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | corruption in shinde fadnavis government allegations by ajit pawar

 

हे देखील वाचा :

Palkhi Mahamarg | पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत; खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

National Lok Adalat At Manchar (Pune) | जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे 11 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Pune PMC Property Tax | 40 टक्के मिळकत कर सवलत सुरु राहण्यासाठी PT-3 अर्ज भरुन देणे बंधनकारक, अन्यथा…

Pune water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरववठा बंद राहणार

 

Related Posts