IMPIMP

Deepak Pandey IPS Nashik | ‘महसूल अधिकारी हे RDX सारखे आहेत तर….’ नाशिक पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप

by nagesh
IPS Deepak Pandey | Maharashtra IPS police transferred nashik police commissioner deepak pandey about not regret any decision have taken

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Deepak Pandey IPS Nashik | जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये (Land Related Crime) भूमाफिया (Land Mafia) हे महसूल विभागातील (Revenue Department) अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन जागामालकांचा (Landlord) छळ करत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्स (RDX) सारखे आहेत. तर कार्यकारी दंडाधिकारी (Executive Magistrate) यांचे अधिकारी डिटोनेटरसारखे (Detonator) आहेत. आरडीएक्स आणि डिटोनेटर मिळून जिवंत बॉम्ब (Live Bomb) बनतो, जो भूमाफिया त्यांच्या मर्जीप्रमाणे वापरत असल्याचा गंभीर आरोप नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik CP Deepak Pandey) यांनी केला आहे. पोलीस महासंचालकांना (DGP) लिहिलेल्या पत्रात नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik CP Deepak Pandey) यांनी महसूल विभागावर गंभीर आरोप केले आहेत. (Deepak Pandey IPS Nashik)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अधिकार काढून घेण्याची मागणी
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey IPS Nashik) यांनी महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शहरीकरण (Urbanization), औद्योगिकरण (Industrialization), आधुनिकीकरणासाठी (Modernization) महसूल अधिकाऱ्यांकडील कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

महसूल अधिकार काढून घेतल्यास…
भूमाफियांमुळे जागामालक हतबल व भयभीत झाले आहेत. इच्छा नसतानाही कमी दराने जागा विक्री करत आहेत किंवा भूमाफिया जागा बळकावत आहेत.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भूमाफिया हे काम करत आहेत.
त्यामुळे महसूलचे अधिकार काढून घेतल्यास भूमाफियांवर अंकुश ठेवता येईल, असेही पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

पोलीस आयुक्तांना जिल्हा दंडाधिकारी करा
नाशिक जिल्ह्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, (1951) चे कलम 7 नुसार पोलीस आयुक्तालयाचा दर्जा देऊन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 20(1) नुसार पोलीस आयुक्त यांना जिल्हा दंडाधिकारी म्हणून घोषित करण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे.

 

Web Title :- Deepak Pandey IPS Nashik | nashik police commissioner deepak pandey serious allegations on revenue department land mafia

 

हे देखील वाचा :

BJP vs NCP | राज ठाकरेंना ‘सरडा’ म्हणणाऱ्या राष्ट्रवादीला भाजपचं उत्तर; म्हणाले – ‘पहाटे शपथविधी झाल्यानंतर पवारांनी त्याच पुतण्याला…’

Money Laundering Case | अनिल देशमुख यांच्यासह 2 सचिव अन् सचिन वाझे केंद्राच्या ताब्यात; CBI चे पथक कारागृहात दाखल

Devendra Fadnavis | संजय राऊतांचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वेश्यांना द्यायच्या पैशातही उल्ला मारणार्‍यांना…’

 

Related Posts