IMPIMP

Business Idea | नोकरीचे टेन्शन संपले, सुरू करा सध्याच्या काळातील हॉट बिझनेस; रोज होईल बंपर कमाई

by nagesh
Business Idea | business idea start laptop mobile repair business earn god income know how to start

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBusiness Idea | देशात बेरोजगारी एक मोठी समस्या बनत चालली आहे. अनेक लोकांमध्ये नोकरीची आवड असते पण नोकरी मिळत नाही. परंतु टेन्शन घेण्याची गरज नाही. आम्ही आपल्याला एक अशी बिझनेस आयडिया देत आहोत. जो आजकाल सर्वात मोठा हॉट बिझनेस आहे. गावातील चौकापासून शहरांपर्यंत याची मोठी मागणी आहे. हा बिझनेस मोबाईल आणि लॅपटॉप रिपेअरिंगचा (Laptop Repairing Shop) आहे. या दोन्ही वस्तूंची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे यात बंपर कमाई होण्याची पूर्ण शक्यता आहे. (Business Idea)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लॅपटॉप आणि मोबाईल वाढत्या वापरामुळे ते रिपेअरिंग करणार्‍यांची मागणी वाढत आहे. लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंग हातातील कला आहे. हा बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे. हा बिझनेस करण्यापूर्वी तुम्हाला रिपेअरिंग शिकावे लागेल. ऑनलाईन सुद्धा हे शिक्षण घेता येते. परंतु एखाद्या संस्थेत जाणे जास्त चांगले आहे. कोर्स केल्यानंतर काही काळासाठी तुम्ही रिपेअरिंग सेंटरवर काम केले तर आणखीच चांगले ठरेल. (Business Idea)

 

अशी करा सुरूवात

तुम्ही एक्सपर्ट झाल्यावर आपल्या बिझनेस उघडा
योग्य ठिकाणी जागा निवडा, जिथे लोक सहज येतील
आजूबाजूला जास्त रिपेअरिंगची दुकाने नसावीत
सुरूवातीला जास्त सामान ठेवण्याची गरज नाही
आवश्यक हार्डवेअर दुकानात ठेवा, महाग हार्डवेअर गरज असेल तेव्हा मागवा

 

जाणून घ्या किती होईल कमाई

एखाद्या शहरात रिपेअरिंगचे दुकान उघडले तर मोठी कमाई होईल. याची सुरूवात 2 ते 4 लाख रूपये करून होऊ शकते. रिपेअरिंगसह लॅपटॉप, मोबाईलची विक्री सुद्धा करू शकता. लॅपटॉप, मोबाईल दुरूस्तीची फी जास्त असते, यातून तुम्ही महिना 70 ते 80 हजार रूपये कमावू शकता. कमाई काम मिळण्यावर अवलंबून आहे.

 

Web Title :- Business Idea | business idea start laptop mobile repair business earn god income know how to start

 

हे देखील वाचा :

Tax On EPF | ‘ईपीएफ’वर लागणार्‍या टॅक्सचा तुमच्यावर कोणता परिणाम होणार ? जाणून घ्या यावर काय म्हणतात एक्सपर्ट

Warning Signs Indicate Health Problem | शरीरात हे संकेत दिसत आहेत का? या 7 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अनेक आजारांपासून होईल बचाव

Business Idea | 30,000 रुपयांचा खर्च आणि 3 लाखांचे उत्पन्न, या बिझनेसमध्ये सरकारकडून सुद्धा मिळेल मदत

 

Related Posts