IMPIMP

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांचे आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले…

by nagesh
 Devendra Fadanvis | devendra fadnavis replied to aditya thackeray allegation of bmc road scam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेमध्ये ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६००० कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिउत्तर दिले. उद्या (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi In Mumbai) हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची सभा बीकेसी मैदानावर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) बीकेसी मैदानावरील तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ज्यांचे संपूर्ण आयुष्य घोटाळा करण्यात गेले, त्यांना सिमेंटचे रस्ते मुंबईत होत आहेत याचे दुःख होत आहे. कारण एकदा का सिमेंटचे रस्ते झाले, तर पुढील ४० वर्षे रस्ते करण्याची गरज पडणार नाही. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढंच आत्तापर्यंत सुरू होतं. २०१८ साली जेव्हा चौकशी झाली, तेव्हा मुंबईतील सुमारे २०० रस्त्यांमध्ये खालची पातळीच नव्हती. अशा प्रकारची कामं त्यांनी २५ वर्ष केली. आता त्यांच्या लक्षात येते आहे की, आपली दुकानदारी बंद करण्याचे काम हे काँक्रीटचे रस्ते करत आहेत. म्हणूनच त्यांची ओरड सुरू आहे. त्यांना आता मुंबईतील जनताच उत्तर देईल.’ अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारी विकासकामे ही महाविकास आघाडीच्या काळतच मंजुरी मिळालेली आहेत. असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘हे झोपेत बोलणारे लोकं आहेत.
मेट्रोचं भूमिपुजन पंतप्रधान मोदींनी केलं होतं, त्याचं उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे.
एसटीपीच्या संदर्भात मी स्वत: मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून परवानगी आणली होती.
मात्र, टक्केवारी ठरली नाही म्हणून या लोकांनी वर्क ऑर्डर काढली नाही.
पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर त्याचे वर्क ऑर्डर आम्ही काढलं.
त्यामुळे ही कामं आमच्या काळात झाली हे म्हणायचा विरोधकांना अधिकार नाही.
’ असा हल्लाबोल त्यांनी (Devendra Fadanvis) यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधीमंडळातील तैलचित्राचे उद्घाटन २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी होणार आहे.
मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने महाराष्ट्रात सध्या सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत होता.
त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘याबाबत मला कल्पना नाही.
हा कार्यक्रम सरकार ठरवत नाही, त्यामुळे मला याबाबत माहिती नाही.’ असेही यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

Web Title :- Devendra Fadanvis | devendra fadnavis replied to aditya thackeray allegation of bmc road scam

 

हे देखील वाचा :

Maharashtra By-Election | चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, तीन आठवड्यांनी सुनावणी

Pune Crime | लेटरपॅड, शिक्के व सरपंचाची बनावट सही करुन ग्रामपंचायतची फसवणूक प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

 

Related Posts