IMPIMP

Devendra Fadnavis | ‘आधी म्हणायचे मी पुन्हा येईन, आता म्हणतात येणार नाही’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातील ‘त्या’ वक्तव्याची जोरदार चर्चा

by nagesh
Devendra Fadnavis | 111 candidates will also be appointed through mpsc announces deputy cm devendra fadnavis in vidhan sabha

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. यामध्ये शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपकडून (BJP) प्रत्येकी 9 असे एकूण 18 आमदारांना शपथ दिली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) येथे आयोजित केलेल्या ‘स्वराज्य महोत्सव आणि घरोघरी तिरंगा’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र भाषणाच्या शेवटी त्यांनी यावर सारवा सारव केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व ‘हर घर तिरंगा’ Har Ghar Tiranga (घरोघरी तिरंगा) कार्यक्रमांतर्गत आयोजित युवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLA Chandrashekhar Bawankule), सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole), शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle), सुनील कांबळे (Sunil Kamble), कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Vice Chancellor Dr. Karbhari Kale), आयोजन समिती अध्यक्ष डॉ. राजेश पांडे (Dr. Rajesh Pandey) आदी उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, पुणे विद्यापीठाने पहिला रेकॉर्ड केला तेव्हा मी मुख्यमंत्री (CM) म्हणून आलो होतो. आता तुम्ही दुसरा रेकॉर्ड करताय मी उपमुख्यमंत्री म्हणून आलोय. जेव्हा तिसरा रेकॉर्ड कराल तेव्हा मात्र मला बोलवू नका, मी येणार नाही, असं बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र भाषण संपवताना फडणवीसांनी आपल्याच विधानावरुन यू टर्न घेतला. पुढच्या कार्यक्रमालाही मला बोलवा, मी कोणत्याही पदावर असलो तरी नक्की येईल, असे म्हणत त्यांनी सारवा सारव केली.

भारताचा तिरंगा ध्वज हा आपल्या आत्मविश्वासाचे, आत्मभानाचे, आत्मतेजाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट रोजी आपला तिरंगा ध्वज घरावर फडकवावा आणि देशाविषयीची अभिमानाची भावना मनात सतत तेवत ठेवावी,
असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कुठल्याही देशातील राष्ट्रभक्त तरुणांनी मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज फडकविण्याचा (Flag Hoisting) हा अनोखा विक्रम असेल.
हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे.
या उपक्रमासोबत स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनामिक स्वातंत्र्य सैनिकांना शोधून नव्या पिढीपुढे आणण्याची आवश्यकता आहे, असे फडणवीस म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आजच्या पिढीत देशाला विश्वगुरु पदापर्यंत पोहोचविण्याची क्षमता

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढी होती, स्वातंत्र्यानंतर देशाला स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय समोर असलेली पिढी होती,
तर आज देशाला विश्वगुरू पदापर्यंत पोहोचविण्याची क्षमता असलेली पिढी देशाला पुढे नेत आहे.
संशोधन, नाविन्यता आणि उद्यमशीलतेच्या बळावर या पिढीने जगाला चकित केले आहे.
जागतिक स्तरावर देशाला विकासाकडे घेऊन जाताना त्यांची नाळ राष्ट्राशी जोडण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे.
बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यात हा उपक्रम यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ध्येय ज्ञानाधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे

फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्याचे हे एक माध्यम आहे.
या माध्यमातून ज्ञानाधारित समाजव्यवस्था निर्माण करायची आहे.
केवळ शिक्षित समाज निर्माण करून उपयोगाचे नाही तर विद्यार्थ्याची वाटचाल ज्ञानाकडे व्हायला हवी आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समग्र व्यक्तिमत्व घडायला हवे.
राष्ट्र घडविण्यासाठी समाजाविषयी जाणीव असलेले विद्यार्थी निर्माण करणारी व्यवस्था अनुकूल परिवर्तन घडवू शकते.
अशा उपक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीला समाजाशी जोडत असल्याने त्याला महत्व आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : –  Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis statement i will come again in discussion at sppu pune

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपाची चर्चा, अशी आहेत मंत्र्यांची संभाव्य खाती; भाजपकडे गृह, अर्थ, महसूल, सहकार, पीडब्ल्यूडी, उर्जा, जलसंपदा

Maharashtra Cabinet Expansion | ‘पहिल्यांदा आरसा पाहावा आणि त्यानंतरच…’ सुप्रिया सुळेंच्या टीकेला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ

Related Posts