IMPIMP

Devendra Fadnavis | ‘GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन कर्तबगारी दाखवा’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा

by nagesh
 Maharashtra Politics News | prakash mahajan says devendra fadnavis cleared fsi of matoshree 2 bungalow uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनकेंद्र सरकारने (Central Government) विविध राज्यांना एकाचवेळी तब्बल 86 हजार 912 कोटी जीएसटी अनुदानाची (GST Subsidy) रक्कम वितरित केली आहे. यापैकी महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाट्याला सर्वाधिक 14 हजार 145 कोटी रुपये आले आहेत. त्यानंतर राज्यात पेट्रोल – डिझेलचे दर कमी (Reduce Petrol-Diesel Rates) करावेत, अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या जीएसटीच्या रकमेनंतर ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. तसेच आतातरी पेट्रोल डिझेलचे दर महाराष्ट्रात तात्काळ कमी करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून जीएसटीपोटी एकूण 29 हजार 600 कोटी रुपये घ्यायचे आहेत. त्यातील 14 हजार 145 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ही महाराष्ट्राला आजपर्यत एका हप्त्यात मिळालेली सर्वात मोठी रक्कम आहे, असे वित्त विभागाचे मुख्य सचिव मनोज सैनिक (Chief Secretary of Finance Manoj Sainik) यांनी म्हटले आहे. तर राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्राने केला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करुन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे.

 

 

 

पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा….

31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पन्सेशनसह (Compensation) संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली.
यात महाराष्ट्राला सर्वाधिक 14,145 कोटी मिळाले.
आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की, पुन्हा आज 1 जून पासून शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार ? राज्य सरकार (State Government) म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा – जेव्हा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) आली, तेव्हा प्रशासनाची ‘ढकलगाडी’ करण्यातच त्यांनी धन्यता मानली.
केंद्रावर दोषारोप हाच पुरुषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तसेच आतातरी पेट्रोल – डिझेलचे दर महाराष्ट्रात तात्काळ कमी करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अद्यापही जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये शिल्लक – अजित पवार

दरम्यान, केंद्र सरकारने जीएसटीचा संपूर्ण परतावा दिल्याचे सांगितले असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र अद्यापही जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये राहिल्याचा दावा केला आहे.
ते म्हणाले, केंद्र सरकारने दिलेले पैसे हे महाराष्ट्राच्या हक्काचे होते. ते आधीच द्यायला हवे होते. आता पैसे आले आहेत.
जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये अद्याप बाकी आहेत. केंद्राने वितरित केलेले 14 हजार कोटी हे जुने कबूल केलेले पैसे आहेत.
पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत. आता पुढचे पैसे त्यांनी लवकरात लवकर द्यावेत ही माफक अपेक्षा असल्याचे अजित पवारांनी म्हटले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis demands petrol diesel prices reduced in state after received gst subsidy rs 14000 crore from center

 

हे देखील वाचा :

Anil Parab Sai Resort Case | अनिल परबांच्या रिसॉर्ट प्रकरणी केंद्राचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Sourav Ganguly Resign As BCCI President? | सौरभ गांगुलीचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा ?; ट्विट करत म्हणाला…

Anil Parab | ‘किरीट सोमय्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही; ज्यावेळी जेलमध्ये जायची वेळ येईल तेव्हा…’

 

Related Posts