IMPIMP

Anil Parab Sai Resort Case | अनिल परबांच्या रिसॉर्ट प्रकरणी केंद्राचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

by nagesh
 Anil Parab | if you trouble poor marathi people i and shivsena will not remail silent anil parab challenge to kirit somaiya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Parab Sai Resort Case | काही दिवसापूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीने (ED) छापेमारी केली. त्यामुळे शिवसेनेला एक धक्का बसला आहे. दरम्यान आता परब यांंच्या साई रिसॉर्ट प्रकरणी (Anil Parab Sai Resort Case) राज्य सरकारने काय कारवाई केली? याचा अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून (Union Ministry of Environment) महाराष्ट्र सरकारला (Maharashtra State Government) दिले आहेत. (Center directs Maharashtra government in Anil Parba’s resort case)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दापोलीतील साई रिसॉर्ट हे मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. सोमय्या यांनी जानेवारी 2022 रोजी केलेल्या तक्रारीनंतर, कोस्टल झोन नियम मोडल्याचे सांगत राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर 31 मे 2022 रोजी राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे, तुम्ही केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मंत्रालयाला सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Anil Parab Sai Resort Case)

 

दरम्यान केंद्र सरकारच्या (Central Government) या पत्रामुळे आता राज्य सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढणार आहे. यानंतर सरकार अनिल परब यांच्या या रिसॉर्टवर काय कारवाई करेल तेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

हे देखील वाचा :

Sourav Ganguly Resign As BCCI President? | सौरभ गांगुलीचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा ?; ट्विट करत म्हणाला…

Anil Parab | ‘किरीट सोमय्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही; ज्यावेळी जेलमध्ये जायची वेळ येईल तेव्हा…’

Post Office Franchise | पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी उघडा, दरमहिना कमवा 50 हजार रुपये; जाणून घ्या

 

Related Posts