IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा NCP व सेनेला टोला, म्हणाले – ‘राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं नोटापेक्षाही कमी’

by nagesh
Winter Session 2022 | devendra fadnavis first comment after lokayukta bill passed in assembly session

सरकारसत्ता ऑनलाइन – Devendra Fadnavis | देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांबाबतचे जे एक्झिट पोल आले होते. त्यामधील गोव्या राज्याबाबतचे (Goa Election) पोल सपशेल फेल ठरले आहेत. पोलमध्ये गोव्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र भाजप (BJP) गोव्यामध्ये पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. तर दुसरीकडे गोव्यातून शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीने (NCP) युती केलेली असतानाही त्यांना फायदा झाला नाही. यावरून विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना टोला हाणला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गोव्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. मात्र त्यांना नोटापेक्षाही None Of The Above (NOTA) कमी प्रमाणात मतदान झालं आहे.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई ही आमच्याशी नाही तर नोटाशी आहे.
आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली मात्र त्यांच्या उमेदवाराला अवघी 97 मते मिळाली आहेत.
नोटाला 6439 मते मिळाली आहेत आणि राष्ट्रवादी आणि युतीला मिळून 6175 मते मिळाली आहेत.

 

काँग्रेसला (Congress) आत्मचिंतनाची गरज असून महत्त्वाचं म्हणजे परिवारवादी पार्ट्यांना हा मोठा संदेश असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी बंड पुकारत पणजी (Panaji) विधानसभा मतदार संघातून अपक्ष (Independent) जागा लढवली होती.
मात्र त्यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या बाबूश मोन्सेरात (Babush Monsera) यांनी त्यांचा पराभव केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना दिलं आहे.
आतापर्यंत लागलेल्या निकालानुसार गोव्यात (Goa) पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | goa assembly elections 2022 devendra fadnavis on bjp victory in goa assembly election criticism on shivsena and ncp

 

हे देखील वाचा :

UP Goa Election Result 2022 | गोवा-युपीत ‘म्याव-म्याव’चा आवाजच आला नाही, भाजप आमदाराचा शिवसेनेला टोला

EPFO | पेंशनहोल्डर्ससाठी गुड न्यूज ! EPS 95 पेन्शन स्कीम अंतर्गत मिळेल जास्त रक्कम, व्याज सुद्धा वाढीव मिळेल

Pension Payment Order (PPO) | पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर विसरलात तर होऊ नका अस्वस्थ, केवळ काही सोप्या पद्धतीने मिळेल परत

 

Related Posts