IMPIMP

EPFO | पेंशनहोल्डर्ससाठी गुड न्यूज ! EPS 95 पेन्शन स्कीम अंतर्गत मिळेल जास्त रक्कम, व्याज सुद्धा वाढीव मिळेल

by nagesh
EPFO | epfo members can apply for non refundable epf advance online

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEPS 95 पेन्शन योजनेद्वारे किमान पेन्शन योजनेची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे, ज्यावर निर्णय होणे बाकी आहे, परंतु EPFO च्या निर्णयामुळे EPS 95 पेन्शन योजनेच्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. EPFO कडे दावा न केलेली ठेव रक्कम 58000 हजार कोटी रुपये आहेत आणि त्यातील काही भाग ईपीएस 95 पेन्शन योजनेत हस्तांतरित करण्याबाबत निर्णय शनिवारी ईपीएफओच्या बोर्ड बैठकीत घेतला जाईल.

दावा न केलेल्या रकमेचा काही भाग हस्तांतरित करून ईपीएस 95 पेन्शन योजना धारकांना अधिक पेन्शन देणे हा उद्देश आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ईपीएस 95 पेन्शन योजना
सध्या, संघटित क्षेत्रातील ते कर्मचारी ज्यांचे वेतन (मूळ वेतन + DA) रुपये 15 हजारांपर्यंत आहे ते EPS – 95 अंतर्गत येतात. पगाराच्या 8.33% रक्कम ईपीएस – 95 पेन्शनमध्ये जाते म्हणजेच जास्तीत जास्त 1250 रुपये दरमहा योगदान जमा केले जाऊ शकते. ईपीएफओच्या मते, असे 68 लाख सदस्य आहेत.

 

ट्रान्सफर रकमेवर शनिवारी निर्णय
सरकारच्या 2015 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दावा न केलेल्या ठेवी ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये हस्तांतरित केल्या जाऊ शकतात. परंतु 2015 आणि 2017 मध्ये ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये हस्तांतरित केल्याबद्दल EPFO मंडळामध्ये विरोध झाला होता.

अशा स्थितीत ते शक्य नव्हते, परंतु यावेळी विना दावा रक्कम ईपीएस 95 पेन्शनधारकांना जास्त पेन्शन देण्यासाठी बोर्डाच्या सदस्यांमध्ये सहमती झाली आहे. ट्रान्सफरच्या रकमेचा निर्णय शनिवारी बोर्डाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

 

पेन्शनपात्र वेतन मर्यादा
ईपीएस 95 खात्यातील योगदान पगाराच्या 8.33% आहे. मात्र, सध्या पेन्शनपात्र पगार केवळ 15 हजार रुपये मानला जातो. यासह, या पेन्शनचा हिस्सा दरमहा जास्तीत जास्त 1250 आहे. या अंतर्गत, किमान 1000 आणि कमाल 7,500 रुपये पेन्शन (Pension) दिले जाते.

15 हजारांच्या मर्यादेतही वाढ करण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या बैठकीत आहे, ही मर्यादा वाढवल्यास किमान पेन्शनचा वाटाही वाढेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुन्हा होऊ शकतो केवळ 8.5% व्याजदर देण्याचा निर्णय

शनिवारी होणार्‍या बोर्डाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2022 चे व्याजदरही ठरवले जाणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये देखील, सर्व सदस्यांना 8.5% व्याजदर देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो कारण EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सर्व सदस्य 8.5% व्याजदराच्या बाजूने आहेत कारण भांडवली स्थिती चालू वर्षात चांगली आहे.
आणि इक्विटी गुंतवणुकीनेही चांगली कमाई केली आहे. (Pensioners)

 

व्याजदरात कपात नाही ?

FY14 आणि FY15 मध्ये 8.75% व्याजदर

FY16 मध्ये व्याजदर 8.80%

FY17 मध्ये व्याजदर 8.65%

FY18 मध्ये व्याजदर 8.55%

FY19 मध्ये व्याजदर 8.65%

FY20 मध्ये व्याजदर 8.5%

FY21 मध्ये व्याजदर 8.5%

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- EPFO | eps 95 pension subscribers to get more pension as unclaimed amount portion to get transfer and epfo board to decide on interest rate

 

हे देखील वाचा :

Pension Payment Order (PPO) | पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर विसरलात तर होऊ नका अस्वस्थ, केवळ काही सोप्या पद्धतीने मिळेल परत

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 116 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tina Dutta Glamorous Photo | छोट्या पडद्यावरील ‘संस्कारी सूने’नं ओलांडल्या सर्व मर्यादा, ग्लॅमरस फोटोशूटनं वाढवले चाहत्यांच्या हृद्याचे ठोके

 

Related Posts