IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस-अजित पवारांमध्ये जुगलबंदी; माईक, चिठ्ठी अन्…

by nagesh
Devendra Fadnavis | ncp leader ajit pawar target cm eknath shinde and dcm devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. त्यामुळे उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कॅबिनेटमध्ये काम करावं लागत आहे. त्यातच अनेकदा शिंदे आणि फडणवीस यांच्यातील काही किस्से सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विधानसभेत (Assembly) विश्वासदर्शक ठराव पास झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांच्या समोरील माईक फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतला. हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला. मूळात हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे असं पत्रकाराने म्हटले होते. मात्र विरोधकांनी या व्हिडीओचं भांडवल करत खरे मुख्यमंत्री (CM) देवेंद्र फडणवीसच असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. त्यानंतर पुन्हा एका पत्रकार परिषदेत फडणवीसांनी चिठ्ठी लिहून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिली. त्यामुळे सुपर सीएम कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेत कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आले नाही.
आत्ताच माईक ओढाओढी चालली, कागदं एकमेकांना देतायेत. कुणाचा कुणाला मेळ नाही.
अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) नाही. कशासाठी थांबवलं आहे.
पालकमंत्री नेमा, सध्या दोघेच महाराष्ट्राचे मालक झालेत. ज्या प्रकारे निर्णय व्हायला पाहिजेत तसे होताना दिसत नाही, असे त्यांनी सांगितले.
तर नवीन आलेले सरकार गोंधळलेले आहे. उपमुख्यमंत्री सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या चुका काढत आहेत.
काहीतरी एकनाथ शिंदे यांच्यामागे षडयंत्र भाजप करतंय हा माझा आरोप आहे असे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले.

 

तर माईक म्यूट करुन व्हिडीओ फिरवणं, माझ्या मुख्यमंत्र्यांना मी चिठ्ठी लिहिली तर बिघडलं कुठे ? कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नको, आमचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतोय.
मात्र काही लोकांना हे बघवत नाही.
आता तुम्हाला विरोधात बसण्याची सवय केली पाहिजे असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
त्यामुळे राज्यात माईक, चिठ्ठी आणि राजकीय टोलेबाजीला रंग आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Devendra Fadnavis | ncp leader ajit pawar target cm eknath shinde and dcm devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Diabetes च्या रूग्णांसाठी रामबाण आहे घरातील ‘हा’ मसाला, जाणून घ्या कसा करावा वापर

Headache Solution | नेहमी डोकेदुखीने होत असाल त्रस्त तर ‘या’ 5 घरगुती उपायांनी करा उपचार; जाणून घ्या

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला ?

 

Related Posts