IMPIMP

Diabetes च्या रूग्णांसाठी रामबाण आहे घरातील ‘हा’ मसाला, जाणून घ्या कसा करावा वापर

by nagesh
Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes | आपल्या स्वयंपाकघरात असलेले बहुतेक मसाले असे आहेत की ते जेवणाची चव वाढवण्यासोबतच औषधी
गुणधर्मांनी परिपूर्ण असतात आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासही मदत करतात. हळद, हिंग, काळी मिरी, जिरे, ओवा हे यापैकी काही मसाले आहेत.
या यादीत समावेश असलेला आणखी एक मसाला म्हणजे दालचिनी. दालचिनी (Cinnamon) चा वापर केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक
पदार्थांमध्ये केला जातो. (Diabetes)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विशेषतः केक, पेस्ट्री सारख्या बेक केल्या जाणार्‍या डेझर्टमध्ये दालचिनी पावडरचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की दालचिनी तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. विशेषत: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दालचिनी मधुमेह (Diabetes), विशेषत: टाइप 2 मधुमेह नियंत्रित करण्यास कशी मदत करू शकते ते जाणून घेवूयात…

 

दालचिनीने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होईल का?
अमेरिकन वेबसाइट healthline.com नुसार, अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की दालचिनी ब्लड शुगर (Blood Sugar) कमी करण्यास मदत करते. टाईप 2 मधुमेह असलेल्या 543 रूग्णांवर एक संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 24 mg/dL ने कमी झाली. (Diabetes)

 

अनेक लोकांमध्ये जेवण केल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढू लागते. या वाढीमुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लेमेशन (Inflammation) देखील सुरू होते, ज्यामुळे शरीरातील पेशी खराब होतात आणि मधुमेहासह इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.

 

अशा स्थितीत तुम्ही दालचिनीचा वापर केल्यास जेवणानंतर वाढणारी साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

 

इन्सुलिन सारखे काम करते दालचिनी
इन्सुलिन (Insulin) चा शरीरावर जो प्रभाव दिसून येतो, तसाच परिणाम दालचिनीचाही होतो आणि त्यामुळे दालचिनी रक्तातील ग्लुकोज शरीराच्या पेर्शींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. याशिवाय, दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता देखील वाढवते, ज्यामुळे इन्सुलिन चांगले काम करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका अभ्यासात असे दिसून आले की दालचिनी खाल्ल्यानंतर लगेचच इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि त्याचा प्रभाव सुमारे 12 तास टिकतो. अमेरिकन वेबसाइट webmd.com च्या रिपोर्टनुसार, 40 दिवस दररोज 1 ते 6 ग्रॅम दालचिनी खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल 24 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

 

दालचिनीचे आहेत अनेक फायदे
दालचिनी हा औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) समृद्ध असा मसाला आहे, जो प्राचीन काळापासून पारंपारिक औषधे बनवण्यासोबतच आयुर्वेदातही वापरला जात आहे. दालचिनी हा अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा खजिना आहे, जी शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणार्‍या नुकसानापासून वाचवण्यास मदत करते.

 

याशिवाय दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. ब्लड शुगर कंट्रोलसह, दालचिनीचे अनेक फायदे देखील आहेत :

 

1. दालचिनी पोटदुखी, अपचन आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून मुक्त करते.

2. दालचिनी मळमळ, उलट्या आणि लूज मोशन रोखण्यास मदत करते.

3. बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येवरही दालचिनी फायदेशीर आहे.

 

हे देखील वाचा :

Headache Solution | नेहमी डोकेदुखीने होत असाल त्रस्त तर ‘या’ 5 घरगुती उपायांनी करा उपचार; जाणून घ्या

Healthy Diet | हेल्दी डाएटमध्ये लपले आहे दिर्घायुष्याचे रहस्य, रिसर्चमध्ये झाला खुलासा

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला ?

How To Control Blood Sugar Level | ‘या’ एका घरगुती वस्तूने कमी होईल Diabetes आणि Cholesterol ची समस्या; खर्च करावे लागणार नाहीत जास्त पैसे

 

Related Posts