IMPIMP

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी डॉ. हर्षवर्धन, लतादीदींचा फोन, मुख्यमंत्र्यांनीही घेतली माहिती

by pranjalishirish
Dr. to question Sharad Pawar. Harshvardhan, Latadidi's phone; The Chief Minister also took information

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar  यांना रविवारी पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवारांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदान झाले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार Sharad Pawar यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांचे पुढील 15 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती व्हॉट्सऍप स्टेट्सवरून दिली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना 31 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर आवश्यक त्या सर्जरी केल्या जाणार आहेत, असेही सांगण्यात येत आहे.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाल्यानंतर अनेकांकडून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

मुख्यमंत्री ठाकरे, राज ठाकरेंसह लतादीदी, केंद्रीयमंत्र्यांकडून विचारपूस

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आणि ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना सुरु केल्या. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकृतीसंदर्भात आस्थेने विचारपूस केली.

तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही फोन करून शरद पवार Sharad Pawar यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली.

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनीही शरद पवारांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच फोन करून प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील शरद पवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली.

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

 

Also Read

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts