IMPIMP

Pune MHADA Online Registration | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! म्हाडाकडून 5 हजार घरांची सोडत; ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी होणार

by nagesh
Mhada Lottery 2023 | important dates apply process pune mhada lottery 2023 news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune MHADA Online Registration | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे शहर (Pune City) व परिसरात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Maharashtra Housing And Area Development Authority-MHADA) म्हणजेच म्हाडाच्या पाच हजार 68 घरांची सोडत निघणार आहे. याबाबत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune MHADA Online Registration) घरांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती आहे. उद्या 9 जून 2022 रोजी पासून ऑनलाईन नोंदणी (Online Registration) सुरू होणार आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने (MHADA Chief Officer Nitin Mane) यांनी दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

म्हाडाने घर खरेदी करणाऱ्यांच्या उत्पन्न मर्यादेत बदल केला आहे. गृहनिर्माण विभागाकडून (Department of Housing) बुधवारी 25 मे रोजी या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय. उत्पन्न मर्यादेतील बदल मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तसेच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना हा नियम लागू असणार आहे.

 

नितीन माने यांनी सांगितले की, “5 हजार 68 घरांव्यतिरिक्त म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील शिल्लक राहिलेल्या 278, बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्के कोट्यातून उपलब्ध झालेल्या दोन हजार 845 आणि म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 1 हजार 945 अशा सदनिकांचा समावेश असल्याचं,” ते म्हणाले.

 

म्हाडाच्या सोडतीत अत्यल्प, निम्न मध्यम आणि उच्च उत्पन्न गट आहेत.
या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही देण्यात आल्या आहेत.
उत्पन्न मर्यादेनुसार अर्जदाराला अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे.
या उत्पन्न मर्यादेनुसार अर्जदाराला सोडतीत घरासाठी अर्ज भरावा लागतो.
दरम्यान, या घरांच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी 9 जून 2022 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते केला जाणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Draw of 5000 houses from mhada in pune online registration will start from Thursday

 

हे देखील वाचा :

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | ‘राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे एमआयएम-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत’; मनसेचा घणाघात

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune Fire News | औंधमधील सानेवाडीतील आय टी पार्कमधील इमारतीला भीषण आग; इमारतीतील फायर सिस्टिम होती बंद

 

Related Posts