IMPIMP

NCB मोठी कारवाई ! सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नवी माहिती समोर; ड्रग्ज देणारा सापडला

by bali123
drug dealer found who provide drugs sushant singh rajput ncb raids goa

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ( sushant singh rajput ) आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सुशांतसिंह राजपूतला ड्रग पुरविणारा माफिया ‘नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल’च्या (NCB) ताब्यात आला आहे. एनसीबीच्या पथकाने गोव्यात मोठी कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज देणारा जाळ्यात अडकला.

सुशांतसिंह राजपूत sushant singh rajput याच्या आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलने शुक्रवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. यामध्ये 33 आरोपींच्या नावांचा समावेश आहे. त्यामध्ये सुशांतची प्रेमिका रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. त्यानंतर नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलचे (NCB) मुख्य समीर वानखेडे यांनी स्वत: विशेष न्यायालयात 11,700 पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. त्यामध्ये 200 साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण 33 आरोपींपैकी अद्याप 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय याप्रकरणी रिया आणि शौविक जामिनावर सुटले आहेत. यामध्ये संबंधित व्यक्तींबाबत तपास सुरु आहे, अशी माहिती एनसीबीने दिली.

दरम्यान, आत्महत्या प्रकरणानंतर गेल्या वर्षी यासंदर्भात तपास सुरु झाला. त्यावरुन केलेल्या कारवाईत अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाईलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्र म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1368809179490652166

Related Posts