IMPIMP

e-Bus Accident News | भरधाव ई-बसची 17 वाहनांना धडक; 6 ठार, 12 जण जखमी

by nagesh
e-Bus Accident News | e bus hits 17 vehicles kills 6 injures 12 in kanpur road mishap

कानपूर : वृत्त संस्था – Bus Accident News | येथे एका ई बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने १७ वाहनांना धडक दिली. ही घटना टाटामिल चौकात रविवारी रात्री घडली असून यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (e-Bus Accident News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मृत्यू झालेल्या तिघांची ओळख पटली असून शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असून इतर मृतांचीही ओळख पटवण्यात येत आहे. तर जखमींना कृष्णा हॉस्पीटल आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,  ई बसची जबाबदारी आणि मेन्टेनन्सचे चालन करणाऱ्या पीएमआय एजन्सीने घटनेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.  (e-Bus Accident News)

 

 

याबाबत मिळलेली माहिती अशी की, रविवारी रात्री, घाटघर येथून ही बस टाटामिलकडे जात होती. हॅरिसगंज रेल्वे पुलावरुन उतरताच या ई-बसने कृष्णा हॉस्पीटलजवळून राँग साईडने धावायला सुरूवात केली होती. त्यात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने २ कार, १० दुचाकी, २ ई-रिक्षा आणि ३ टेम्पोला धडक देऊन टाटमिलकडे पुढे गेली. या धडकेमुळे एकच गोंधळ उडाला. या बसबे शेवटी टाटमिल येथे एका डंपरला  जोराची धडक दिली. त्यानंतर, चालकाने धूम ठोकली. या अपघातात ६ जण ठार तर १२ जखमी झाले आहेत.  पोलिसांनी या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

Web Title : e-Bus Accident News | e bus hits 17 vehicles kills 6 injures 12 in kanpur road mishap

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोंढव्यात गगन एमिरल्ड सोसायटी पार्किंगमधील जागेवर अतिक्रमण केल्याने इरफान मुलाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Amruta Fadnavis | ‘…हरामखोर का मतलब…. है और सुनने मे आया है….नामर्द है’ ! अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या ‘नामर्द’? राजकीय वर्तुळात चर्चा

TET Exam Scam | IAS सुशील खोडवेकरची करामत ! सावरीकरकडून घेतले पैसे, सुपेनी केले उमेदवार पास; आयएएस अधिकार्‍याला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

 

Related Posts