IMPIMP

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

by nagesh
ED Raid | maharashtra waqf board land case ed raids 7 places ministry comes under jurisdiction ncp minister nawab malik

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  ED Raid | सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज (गुरुवारी) पुण्यातील (Pune) जवळपास सात ठिकाणी धाड टाकली आहे. यावेळी महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात (Maharashtra Waqf Board Land Case) ईडीकडून (ED Raid) मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्ड हे राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या मंत्रालयाच्या अधिकारात येते. तर राज्यात सुरू असलेली आरोपांची रणधुमाळी यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. आत तर ईडीचा ससेमिरा मलिकांच्या मागे लागला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक (Nawab Malik) हे आक्रमक होताना दिसत आहेत.
ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर मलिक यांनी जोरदार आरोप केला आहे.
यानंतर नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले.
या आरोपानंतर राज्य सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे दिसत आहे.
एकीकडे राजकीय वादळ तापलं असतानाच दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाकडून (ED Raid) कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांनी फडणवीस यांना त्यांच्या कथित बदनामीकारक वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती.
मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.
आता या विधानाविरोधात नोटीस पाठवत समीर खान म्हणाले, त्यांच्या घरात ड्रग्ज सापडले नाहीत.
यासोबतच त्यांनी फडणवीस यांच्याकडे 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
तसेच, फडणवीस यांनी आमच्यावर आरोप केले होते की आमच्या घरातून ड्रग्ज सापडले.
माझ्या मुलीने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना माफी मागण्यास सांगितले. त्यांनी माफी मागितली नाही.
तर मानहानीचा खटला दाखल केला जाईल. असं नवाब मलिक म्हणाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : ED Raid | maharashtra waqf board land case ed raids 7 places ministry comes under jurisdiction ncp minister nawab malik

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Amruta Fadnavis | ‘जाहीर माफी मागून ते ट्विट 48 तासांत डिलिट करा, अन्यथा…’, अमृता फडणवीस यांचा मलिकांना इशारा

Yavatmal Crime | सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरचा खून, कॉलेजमध्ये प्रचंड खळबळ

 

Related Posts