IMPIMP

Eknath Khadse | अखेर जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहार प्रकरणाचा गुन्हा दाखल; एकनाथ खडसेंचे पोलिसांवर मोठे आरोप

by nagesh
Eknath Khadse | Finally, a case of embezzlement of Jalgaon district milk union was registered; Eknath Khadse's big allegations against the police

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन –  मागील तीन दिवस जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit ) चोरी आणि अपहार झाल्याचे प्रकरण गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यासाठी जळगाव पोलीस स्थानकात (Jalgaon Police Station) ठिय्या मांडला होता. तरी देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अखेर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूध संघात 14 मेट्रिक टन लोणी आणि 9 टन दूध पावडरची चोरी झाल्याचा फिर्यादींचा दावा आहे. या मुद्देमालाची रक्कम 1 कोटी 15 लाख रुपये आहे. या प्रकरणी आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse), दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) आणि कार्यकारी संचालक मनोज लिमये (Manoj Limaye) यांनी ठिय्या आंदोलन केले होते.

 

दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी आनंद अशोक आंबिकर (Anand Ashok Ambikar), महेंद्र नारायण केदार (Mahendra Narayan Kedar) व सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांच्याविरोधात जळगाव येथील मुख्य न्यायादंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. त्यांनी आरोपिंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी पार पडून अखेर न्यायालयाने भादवि 156(3) अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेण्याचे आदेश पोलीस निरिक्षकांना दिले. या प्रकरणात पोलीस स्वत: फिर्यादी झाले आहेत.

 

गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पोलीस अत्यंत दबावाखाली काम करत आहेत. माझ्यासारख्या आमदाराला तीन दिवस आंदोलन करावे लागत आहे.
त्यावरुन सर्वसामान्य माणसाची अवस्था लक्षात घेता येईल.
राजकीय सुडापोटी पूर्वीचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले.
पुन्हा ते रद्द झाले आणि संचालक मंडळ कामावर आले.
त्यामुळे पोलीस प्रशासन दबावाखाली काम करुन आपली प्रतिष्ठा धुळीला मिळवत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse | Finally, a case of embezzlement of Jalgaon district milk union was registered; Eknath Khadse’s big allegations against the police

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मंत्री अर्वाच्च भाषेत अधिकार्‍यांशी बोलतात, बाप काढतात, ही संस्कृती? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?, अजित पवारांचा परखड सवाल (व्हिडिओ)

Eknath Khadse | ‘भाजपला माघारच घ्यायची होती, तर…’, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

Maharashtra Police Transfer | मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणूकीवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये रस्सीखेच, नाराजीनाट्यात अडकल्या पोलिसांच्या बदल्या!

 

Related Posts