IMPIMP

Eknath Khadse | ‘भाजपला माघारच घ्यायची होती, तर…’, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

by nagesh
Eknath Khadse NCP agitation against Girish Mahajan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून (Andheri By Election) भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी माघार घेतली आहे. सोमवारी (दि. 17) उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यावर सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप (BJP) उमेदवाराने माघार घेतली, कारण त्याला पराभवाची भिती होती, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाच्या उमेदवार ऋजुजा लटके (Rutuja Latke) यांच्या समर्थनार्थ भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली. भाजपने माघार घेण्याचे कारण काहीही असले, तरी प्रथमदर्शनी असे दिसून येते की, भाजपला पराभवाची भिती होती. भाजपने अगोदरच निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यांना जर माघारच घ्यायची होती, तर त्यांनी शिंदे गटाला उमेदवारी द्यायला हवी होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात लढत झाली असती आणि कोण प्रभावी आहे, हे कळाले असते, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

 

दरम्यान, भाजपने आता या निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपने माघार घेताना अनेक कारणे दिली. त्यातील एक म्हणजे कोणतीही पोटनिवडणूक बिनविरोध करायची असते,
असा कायदा नाही पण पद्धत आहे. परंपरा आहे. ती आम्ही पाळली.
दुसरे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
(Sharad Pawar) यांनी भाजपला ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती.
त्यांच्या विनंत्यांना मान देऊन आम्ही माघार घेत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse | ‘BJP had to withdraw, so…’, Eknath Khadse’s attack on BJP

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Transfer | मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणूकीवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये रस्सीखेच, नाराजीनाट्यात अडकल्या पोलिसांच्या बदल्या!

Bilkis Bano Rape Case | धक्कादायक! मोदी सरकारकडून आरोपींच्या सुटकेसाठी दोन आठवड्यात मान्यता, सीबीआय, न्यायाधीशांचा होता विरोध

CM Eknath Shinde | ‘…तेव्हा कळेल’, संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

 

Related Posts