IMPIMP

Ajit Pawar | मंत्री अर्वाच्च भाषेत अधिकार्‍यांशी बोलतात, बाप काढतात, ही संस्कृती? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?, अजित पवारांचा परखड सवाल (व्हिडिओ)

by nagesh
 Ajit Pawar | ajit pawar said take revenge of uddhav thackeray by defeating eknath shinde and bjp in kasba chinchwad by election

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अतिशय गंभीर अशा विविध मुद्द्यावर राज्य सरकारला (State Government) तातडीने काम करण्याची गरज असल्याचे सुचवले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने कालच्या पावसामुळे नागरिकांचे झालेले नुकसान, भविष्यातील चक्रीवादळाचा धोका, शेतकरी अजूनही नुकसान भरपाई वंचित असल्याचा मुद्दा, राज्य सरकारचा सरकारी शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय, 100 रूपयात दिवाळी शिधा देण्याच्या निर्णयातील गोंधळ, मंत्र्यांची काम करण्याची वाईट पद्धत, अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच राज्य सरकारला यावर ताबडतोब निर्णय घेण्याचे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री आणि लोकप्रतिनीधींच्या वागण्यावर अजित पवार म्हणाले, सरकारला 100 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे 9 दिवस असतात हे मान्य. पण लोकप्रतनिधींना कशा पद्धतीने वागायचे याचे तारतम्य राहिलेले नाही. यांचे लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांना म्हणतात ‘तुमच्या बापाची पेंड आहे का? किती वाजता आला? तुमची वाट बघायला आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल’. महाराष्ट्रात ही भाषा? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? असा परखड सवाल (Ajit Pawar) यांनी केला.

 

 

अजित पवार पुढे म्हणाले, एवढ्यावरच हे थांबलेले नाही. काही मंत्र्यांच्याही अर्वाच्य भाषेत संवाद साधणार्‍या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात नेमका आवाज मंत्र्यांचाच आहे की कुणी नकली आवाज काढला हे समजले पाहिजे. मंत्र्याला बदनाम करण्यासाठी कुणी कारस्थान केले आहे का हेही तपासा. पण जर मंत्रीच ‘काम नाही का रे तुम्हाला सणासुदीचे? दिवसभरात 500 फोन लावता? मी ती परीक्षा रद्द केली. फोन ठेव, अशी भाषा वापरत असतील तर? ही काय भाषा आहे?

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एक तर बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. भरतीच्या नुसत्या घोषणा सुरू आहेत. तरुण-तरुणी आशेने त्या विभागाच्या मंत्र्यांना फोन करतात. पण त्यांची फोनवर ही भाषा आहे. यासाठी त्यांना मंत्री केले आहे का? याचेही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे.

 

राज्य सरकारला सुनावताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर लक्ष ठेवले पाहिजे. यांच्या आमदारांनी तारतम्य ठेवले पाहिजे. यांच्या लोकप्रतिनिधींना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिलेला नाही. याची नोंद सरकारने घेतली पाहिजे.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar slams cm eknath shinde devendra fadnavis ministers

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | ‘भाजपला माघारच घ्यायची होती, तर…’, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

Maharashtra Police Transfer | मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणूकीवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये रस्सीखेच, नाराजीनाट्यात अडकल्या पोलिसांच्या बदल्या!

Bilkis Bano Rape Case | धक्कादायक! मोदी सरकारकडून आरोपींच्या सुटकेसाठी दोन आठवड्यात मान्यता, सीबीआय, न्यायाधीशांचा होता विरोध

 

 

Related Posts