IMPIMP

मुलाला शाळेत प्रवेश मिळत नसल्यानं केला थेट मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ‘ई-मेल’, मुंढवा पोलिसांकडून 45 वर्षीय व्यक्ती ताब्यात

by bali123
Fear that a bomb will be planted in the ministry after receiving threatening mail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – मंत्रालयात (ministry) बॉम्ब (bomb) ठेवल्याचा ई-मेल (E-mail) करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) मुंढवा पोलिसांनी (Mundhwa police) ताब्यात घेतले आहे. त्याला आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात देण्यात येणार आहे. मुलाला शाळेत प्रवेश (Admission to school) मिळत नसल्याने केला होता धमकीचा ई-मेल (E-mail).

शैलेश नारायण शिंदे (Shailesh Narayan Shinde) (वय 45, रा. बी. टी कवडे रोड) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

तीन आठवड्यापूर्वी मंत्रालयात (ministry) बॉम्ब (bomb) असून, मंत्रालय उडवून देण्याची धमकीचा ई-मेल (E-mail) केला होता. यानंतर मुंबईसह राज्यात खळबळ उडाली होती. लागलीच मुंबई पोलीस (Mumbai Police) व दहशत वाद विरोधी पथकाने (Anti-terror squad) मंत्रालयात धाव घेऊन तपासणी केली होती. तर येथील सुरक्षा व्यवस्थाही वाढवली होती. पण, तपासानंतर हा ई-मेल फेक असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो सापडत नव्हता. मुंबई पोलिसांना फोन करणारा व्यक्ती पुण्यातील मुंढवा येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती मुंढवा पोलिसांना दिली. त्यानुसार शैलेश याला रात्री ताब्यात घेतले आहे. तर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरू होती.
दरम्यान शैलेश याच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळत नव्हता.
त्यामुळे त्याने हा ई-मेल केला असल्याचे समोर आले आहे.
शैलेश काहीच काम धंदा करत नसल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले.

Web Tital : – Fear that a bomb will be planted in the ministry after receiving threatening mail

Related Posts