IMPIMP

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

by nagesh
FIR On NCP Sachin Dodke | Case filed against NCP's Sachin Dodke; BJP general secretary was threatened and workers were beaten up

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – FIR On NCP Sachin Dodke | आमदार निधीमधून सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करुन कामगार व पेंटरांना मारहाण (Beating) करुन पेंटरचा कलर फेकून दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके (Former Corporator Sachin Dodke) व त्याच्या कार्यकर्त्यांवर वारजे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी भाजपचे सरचिटणीस आणि बांधकाम व्यवसायिक वासुदेव शिवाजी भोसले BJP Vasudev Shivaji Bhosale (वय ४५, रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (११६/२३) दिली आहे. हा प्रकार वारजे येथील आर एमडी कॉलेज ते साई सयाजीनगरमधील अंडरपासमध्ये मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडला. (FIR On NCP Sachin Dodke)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वासुदेव भोसले यांचा बांधकाम व्यवसाय असून ते भाजपचे
सरचिटणीस आहेत. आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्या आमदार निधीतून
आरएमडी कॉलेज (RMD College) येथील अंडरपास येथे काम चालू होते.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके व त्यांचे कार्यकर्ते जमले.
त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन “कोण ++++ येथे काम करतोय मी येथे काम करणार होतो,
कोण मला आडवतोय बघतो, त्याचे हात पाय तोडतो, तो कसा वारज्यात राहतोय बघतोच,” असे म्हणून
फिर्यादीस धमकी देण्यास सुरुवात केली. हातात बांबु घेऊन कामगार व पेंटर यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन पेंटरचा कलर फेकून देऊन नुकसान केले. पोलिसांनी सचिन दोडके, संजय दोडके व त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मुंढे (PSI Munde) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- FIR On NCP Sachin Dodke | Case filed against NCP’s Sachin Dodke; BJP general secretary was threatened and workers were beaten up

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime News | पत्नी कामावर गेल्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला

Pune Hadapsar News | हडपसरमध्ये गुढीपाडवा उत्सवानिमित्त अनेक सामाजिक संघटनांकडून शोभा यात्रा

 

Related Posts