IMPIMP

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कंपनीलाच काम का दिले ?, NSE ला ED ची नोटीस

by nagesh
Former Mumbai CP Sanjay Pandey | why sanjay pandeys company was hired ed notice to national stock exchange

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai CP Sanjay Pandey) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. CBI ने गुन्हा नोंदवल्यानंतर ED ने त्यांची चौकशी सुरू केली आहे. आता या प्रकरणी ईडी (सक्तवसुली संचालनालय) ने आणखी एक नवीन गुन्हा नोंदवण्याची तयारी सुरू केली आहे. पांडे यांनी स्थापन केलेली ऑडिटिंग कंपनी आय-सेक सिक्युरिटीज प्रा. लि. या नवख्या कंपनीला सायबर सिक्युरिटीसारख्या महत्वाच्या विषयाचे ऑडिटचे काम दिल्याने, याचा खुलासा करण्यासंदर्भात ईडीने आज राष्ट्रीय शेअर बाजाराला कारणे दाखवा नोटीस जारी केल्याचे समजते. (Former Mumbai CP Sanjay Pandey)

 

ईडीच्या नोटीसनंतर आता राष्ट्रीय शेअर बाजाराने खुलासा दिल्यानंतर या प्रकरणी मनी लॉड्रिंगचा आणखी एक नवा गुन्हा दाखल होऊ शकतो. 5 जुलै रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय शेअर बाजारात झालेल्या को-लोकेशन घोटाळ्यात मनी लॉड्रिंग झाल्याच्या संशयावरून तीन तास चौकशी केली होती. या चौकशीमध्ये ईडीच्या अधिकार्‍यांनी एनएसई-को-लोकेशन घोटाळ्यासंदर्भात पांडे यांना काही प्रश्न विचारले त्यांचा जबाब नोंदविला. पांडे यांचा जबाब मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील फौजदारी कलमांतर्गत नोंदवल्याचे समजते. (Former Mumbai CP Sanjay Pandey)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ईडीने आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या कामकाजाशी संबंधित ही चौकशी केली आहे. 2010 ते 2015 मध्ये आयसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, इतर काही कंपन्यांपैकी एक, यांनी कथित को-लोकेशन अनियमिततेनंतर एनएसईचे सुरक्षा ऑडिट केले होते. मार्च 2001 मध्ये पांडे यांनी कंपनीची स्थापना केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले आणि त्यांच्या मुलाने आणि आईने कंपनी ताब्यात घेतली.

 

सुरुवातीला सीबीआयने एनएसई घोटाळ्यामध्ये 2018 मध्ये गुन्हा दाखल करून तपास केला होता. एजन्सीने या प्रकरणी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांचा जबाब आधीच नोंदवला आहे. रामकृष्ण तिहार तुरुंगात आहेत. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी रामकृष्ण आणि समूहाचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मार्चमध्ये अटक केली होती. ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांबाबत सीबीआयच्या तक्रारीची दखल घेतली होती.

 

Web Title :- Former Mumbai CP Sanjay Pandey | why sanjay pandeys company was hired ed notice to national stock exchange

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पुणे-मुंबई महामार्गावरील लॉजमध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 2 महिलांची सुटका

Maharashtra Elections 2022 | 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

Clove Beneficial In Weight Loss | खरंच वजन कमी करते का लवंग? जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

 

Related Posts