IMPIMP

Gangster Sharad Mohol | गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगेमधील राधा चौकात ‘राडा’ ! वाहनांवर दगडफेक करुन फोडल्या काचा, दहशत पसरविण्याचा प्रयत्न

by nagesh
Gangster Sharad Mohol | Pimpri Chinchwad Hinjewadi Police Station book sharad hiraman mohol and others mahalunge radha chowk pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  व्यावसायिक वादातून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली, या कारणावरुन शरद मोहोळ (Gangster Sharad Mohol) याच्या सांगण्यावर त्याच्या टोळक्याने म्हाळुंगे (Mahalunge) येथील राधा चौकातून (Radha Chowk, Mahalunge) जाणार्‍या येणार्‍या गाड्यांवर दगडफेक केली. कुंड्या फेकून मारुन व्यावसायिकाच्या साथीदारांवर गंभीर हल्ला केला (Pune Crime). वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Gangster Sharad Mohol)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम (PSI Samadhan Kadam) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शरद हिरामण मोहोळ Gangster Sharad Mohol (रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड), आलोक शिवाजी भालेराव Alok Shivaji Bhalerao (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरुड), मल्हारी मसुगडे mhalari Masugude (रा. ताजणे वस्ती कॉर्नर, माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बा. हगवणे Siddhesh Hagvane (वय ३०, रा. महाळुंगे) व त्याचे इतर ५ ते ६ साथीदारांवर गुन्हा (FIR on Sharad Mohol Gang) दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ८ रोजी मध्यरात्री सव्वा बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड विठ्ठल शेलार (Vittal Shelar) याने व्यावसायिक वादातून हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. त्यामुळे गँगस्टर शरद मोहोळ (Gangster Sharad Mohol) याच्या सांगण्यावरुन सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे आले. त्यावेळी तेथून एक गाडी जात होती. ती विठ्ठल शेलार याची असल्याचे समजून त्यांनी गाडीतून पळून जाणार्‍या साथीदारांवर दगड व कुंड्या फेकून मारुन गंभीर हल्ला केला. तसेच राधा हॉटेल व तेथून येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या जीवाची पर्वा न करता रोडवर दगडफेक केली. (Pimpri Chinchwad Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वाहनांच्या काचा फोडल्या. लोकांमध्ये दहशत निर्माण केली.
हा प्रकार समजताच हिंजवडी पोलीस (Hinjewadi Police) घटनास्थळी धावून गेले.
तोपर्यंत टोळके तेथून पळून गेले होते. शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचा अपहरण करुन
खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
त्याला व आलोक भालेराव यांना येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते.

 

त्यावेळी त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी (Qateel Siddiqui) याचा नाडीने गळा आवळून खून (Murder in Yerwada Jail) केला होता.
या खटल्यातून त्यांची पुरावा अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

विठ्ठल शेलार हाही मुळशी (Mulshi) तालुक्यातील मुळचा राहणारा आहे.
त्याच्याविरुद्ध खून, अपहरण, दरोड्याची तयारी आदी गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार MCOCA (मोक्का) Mokka कारवाई करण्यात आली होती.
गुंडाच्या टोळ्यांमधील स्पर्धेतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gangster Sharad Mohol | Pimpri Chinchwad Hinjewadi Police Station book sharad hiraman mohol and others mahalunge radha chowk pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Police | आरोग्य पेपर फुटी प्रकरणात पोल्ट्री व्यावसायिकाला अटक; एजंट जीवन सानपसाठी उमेदवारांकडून गोळा करीत होता पैसे

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या लेटेस्ट दर

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत करात यंदा वाढ नाही

Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने

 

Related Posts