IMPIMP

Gas Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

by nagesh
LPG Gas Price Hike | lpg price commercial cylinder price increased by rs 105 check new rates

सरकारसत्ता ऑनलाइन  – Gas Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात गॅस दरवाढीचा झटका पुणेकरांना बसला आहे. गेल्या तीन महिन्यापासून स्वयंपाकाच्या गॅस दरात सातत्याने वाढ होत आहे. आता प्रयत्न १०० रुपयांनी गॅसचे वाढले आहे. त्यातच बुधवारी आणखी यामध्ये २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. दरम्यान वर्षभराच्या तुलनेत सिलिंडरच्या दरात (Gas Price Hike) तब्बल २९१ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गॅस दरात दरमहा सरासरी प्रति सिलिंडर २४ रुपये २५ पैशांची वाढ झाल्याने प्रत्येक कुटुंबावर आता वर्षाला सुमारे पाच हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ऑगस्टमध्ये सिलिंडरसाठी ८६२ रुपये मोजावे लागत होते. नव्या दरानुसार आता ८८८ रुपये मोजावे लागत आहेत. साधारण चार व्यक्तींचे कुटुंब असलेल्यांना दरमहा किमान एक तर, चारहून अधिक व्यक्ती असलेल्या कुटुंबांना दरमहा दोन गॅस सिलिंडर (Gas Price Hike) आवश्‍यक आहेत. त्यानुसार त्यानुसार चार सदस्यांचे कुटुंबाला आता दरमहा तीनशे रुपये तर त्याहून मोठ्या कुटुंबांना दरमहा सहाशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

पुण्यात ११ लाख ९९ हजार २३८ इतकी गॅस सिलिंडरधारकांची संख्या आहे. त्यामध्ये दोन सिलिंडरधारकांची संख्या ६ लाख २१ हजार २८७ तर एक सिलिंडरधारक ५ लाख ७७ हजार ९५१ इतकी आहे.

 

२०२० वर्षातील महिनानिहाय किंमत (प्रति सिलिंडर)

सप्टेंबर २०२० -५९७ रुपये

आक्टोबर २०२० -५९७ रुपये

नोव्हेंबर २०२० -५९७ रुपये

डिसेंबर २०२० – ६९७ रुपये

 

२०२० वर्षातील महिनानिहाय किंमत (प्रति सिलिंडर)

जानेवारी २०२१ -६९७ रुपये

फेब्रुवारी २०२१ -७७२ रुपये

मार्च २०२१ – ८२२ रुपये

एप्रिल २०२१ – ८१२ रुपये

मे २०२१ -८१२ रुपये

जून २०२१ -८१२ रुपये

जुलै २०२१ -८३७.५० रुपये

ऑगस्ट २०२१ -८६२.५० रुपये

सप्टेंबर २०२१ -८८७.५० रुपये

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :  Gas Price Hike | gas prices rising one year 291 rs price hike in pune

 

हे देखील वाचा :

Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा ‘ही’ 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा

NCB Officer Arrest | रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या NCB च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?

 

Related Posts