IMPIMP

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Income Tax Department | सनदी अधिकाऱ्यांना ‘आवडी’च्या ठिकाणी पोस्टिंग तसेच विकास कामांना सरकारी मंजुरी देण्यासाठी कार्यरत असणऱ्या मध्यस्थी रॅकेटचा प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) पर्दाफाश केला आहे. सुमारे १ हजार कोटींपेक्षा अधिक संशयास्पद व्यवहार या रॅकेटच्या माध्यमातून झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आवडीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी म्हणून तब्बल २०० काेटी रुपये माेजले असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्तिकर विभागाने २३ सप्टेंबरला राज्यातील काही व्यावसायिक, मध्यस्थ तसेच सरकारी कार्यालयांमध्ये अधिकार पदांवर बसलेल्या काही जणांवर छापे मारले हाेते. ६ महिने पाळत ठेऊन ठोस पुरावे मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) ही छापेमारी केली असून २५ निवासी आणि १५ कार्यालयांवर कारवाई केली. संबंधितांकडील इन्क्रिप्टेड पद्धतीने सुरक्षित संवाद फोडण्यात प्राप्तिकरला यश मिळाले असून डिजिटल स्वरूपातील पुरावेही गाेळा केले आहेत. कारवाईत ४.६ काेटी रुपये राेख आणि जवळपास ३.४२ कोटींचे जप्त केले आहे. प्राप्तिकरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण १०५० काेटी रुपयांचा हा घाेटाळा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

तपासत अनेक धक्कदायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील ओबेराॅय हाॅटेलमध्ये (oberoi hotel mumbai) या रॅकेटमधील दोन मध्यस्थांनी काही सुट्स कायमस्वरूपी भाड्यावर घेतले आहेत.
त्याचा वापर केवळ बैठकांसाठी करण्यात येत होता. ठराविक मंत्रालयात पोस्टिंग मिळवण्यासाठी काही सनदी अधिकाऱ्यांनी माेठ्या प्रमाणावर पैसा दिला.
ठराविक पोस्टिंगसाठी ठराविक रक्कम आकारली जात होती त्याला त्यांच्या भाषेत चार्ज म्हणायचे. कोडनेटद्वारे त्याचा उल्लेख करण्यात येत होता.
१० वर्षापूर्वीचे एका प्रकरणाची नोंद आढळून आली. त्यामध्ये आवडीच्या पोस्टिंगसाठी २०० कोटी मोजले होते.
दरम्यान, कंत्राटदारांनीही अडकलेले पैसा मिळण्यासाठी दिलेली लाच आणि दलालीही या कारवाईतून पकडण्यात आली आहे.

 

कारवाईदरम्यान, प्राप्तिकरला आणखी एका मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. एका व्यवसायिकाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या.
त्यानंतर त्या जमिनी सरकारी विभाग आणि बड्या कार्पाेरेट्सला विकून अमाप संपत्ती गाेळा केली आहे. विविध सरकारी याेजना, खाणी इत्यादींसाठी या जमिनी देण्यात येत हाेत्या.
या याेजनेचा अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी तसेच त्यांचे नातेवाईक व इतर बड्या लाेकांनी ‘लाभ’ घेतला आहे.
या सर्व व्यवहारांच्या नोंदी तारखेनिहाय मध्यस्थाकडे आढळल्या आाहेत. तब्ब्ल २७ कोटी रोख आणि ४० काेटी रुपयांचे पेमेंट केल्याच्या नाेंदी आहेत.

प्राप्तिकरने डिजिटल स्वरूपात डाटा (digital data) गोळा केला आहे. डिजिटल डाटा विविध पेन ड्राईव्ह, स्मार्टफाेन्स, ई-मेल, आयक्लाउड इत्यादींमधून हस्तगत करण्यात आला आहे.
एका व्हाॅट्सअँप चॅटमध्ये (Whatsapp Chat) तर २८ काेटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आढळला आहे. या डाटाच्यामाध्यमातून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Income Tax Department | cream posting racket exposed by income tax department in maharashtra

 

हे देखील वाचा :

Richest Indian | सावित्री जिंदाल सर्वात श्रीमंत भारतीय महिला, प्रमुख 100 श्रीमंतांमध्ये दिव्या गोकुळनाथ यांच्यासह 6 महिलांना स्थान

Pune Crime | बारा लाखांची फॉच्युनर 50 हजार देऊन घेऊन गेला; गाडी गेली वर कर्जाचे हप्ते थकविले, शेतकर्‍याची फसवणूक

PM-Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 10वा हप्ता मिळवण्याची शेवटची संधी, आता 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; जाणून घ्या

 

Related Posts