IMPIMP

Gautam Adani | गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा; तपशील गुलदस्त्यात

by nagesh
Gautam Adani | gautam adani meets sharad pawar today

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन- अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP
Chief Sharad Pawar) या दोघांची पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर (Silver Oak Bungalow) भेट झाली. या दोघांमध्ये बंद दाराआड दोन तास
चर्चा झाली. मात्र, कोणत्या विषयी चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीली खूप
महत्त्व प्राप्त झालं आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांनी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी शरद पवार यांनी भेट घेतली.

 

अदानी प्रकरणी (Adani Case) जेपीसी (JPC) स्थापन करावी अशी मागणी काँग्रेसकडून (Congress) करण्यात आली होती. परंतु शरद पवार यांनी
अदानींची पाठराखण केली. अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. अदाणी यांना जाणून बुजून टार्गेट केले
जात असावं, असं आम्हाला वाटतं असल्याचे शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत आले. त्यानंतर आज
(गुरुवारी) अदानी (Gautam Adani) यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते की, देशात इतर प्रश्न असताना अदानी यांचे प्रकरण महत्वाचे नाही. हिंडेनबर्ग (Hindenburg) हे नावही मी कधीच ऐकलेलं नाही. त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा, असंही शरद पवार म्हणाले होते. तसेच जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समितीच्या विरोधाच त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आज या दोघांमध्ये तब्बतल दोन तास चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 

 

Web Title :- Gautam Adani | gautam adani meets sharad pawar today

 

हे देखील वाचा :

MNS Anil Shidore | राज्य सरकारच्या मराठी विषयाबाबतच्या ‘त्या’ निर्णयानंतर मनसेकडून कडाडून विरोध, म्हणाले…

Pune News | पुणे : रामदास आठवले, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभिनेते सयाजी शिंदे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार’ होणार प्रदान

Maharashtra Political News | शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं शिबिर, प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचे नाव वगळल्याने चर्चांना उधाण

 

Related Posts