IMPIMP

Girish Mahajan | ‘जितेंद्र आव्हाड प्रकरण सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे’ – गिरीश महाजन

by nagesh
Girish Mahajan | chhatrapati sambhajinagar mahavikas aghadi bjp girish mahajan maharashtra politics

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर टीका केली आहे. खडसेंना सर्व काही आपल्या घरात पाहिजे. सर्व ठिकाणी त्यांना त्यांच्या कुटुंबातील माणसे पाहिजे आहेत, असे गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात जनजाती दिवासाच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बिरसा मुंडा (Birsa Munda) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाजन बोलत होते. तळोदा नगरपालिकेच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. आज बिरसा मुडां यांची जयंती असल्याने, आजपासून हा पुतळा नागरीकांसाठी खुला करण्यात आला आहे.

 

यावेळी महाजनांनी विविध मुद्यांना हात घातल भाष्य केले. एकनाथ खडसे यांच्या दूध संघ प्रकरणात त्यांचे कॉल रेकॉर्डींग आणि पत्र यावरुन सर्व काही स्पष्ट होईल. जळगाव दूध संघाचे कार्यकारी संचालक महेश लिमये (Mahesh Limaye) यांना झालेली अटक आणि सुरु असलेली चौकशी कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरीत नाही. या प्रकरणात पुर्ण चौकशी होऊ द्या, असे महाजन म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्यावर देखील टीका केली. जितेंद्र आव्हाडांचे प्रकरण सुर्य प्रकाशाएवढे स्वच्छ आहे. चित्रपटगृहात लोकांना मारहाण करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? आधीच्या महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात नारायण राणे, राणा दांपत्य, कंगणा राणावत यांच्यावर केलेली कारवाई कोणत्या नियमांतून केली? ती कारवाई सुडबुद्धीने झालेली नाही का? असे प्रश्न देखील यावेळी महाजन यांनी उपस्थित केले.

 

शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटून गेले,
तरी देखील राज्याच्या दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झाला नसल्याने विरोधक टीका करत आहेत.
त्यावर बोलताना महाजन म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या गोष्टीच्या बाबत निर्णय घेतील.
मध्यावधी निवडणुकांच्या प्रश्नावर महाजन म्हणाले, हा विषय माझ्यासाठी हास्यास्पद आहे.
आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणताही धोका नाही.विरोधकांनी त्यांची चिंता करावी.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Girish Mahajan | ‘Jitendra Awhad case is as clear as sunlight’ – Girish Mahajan

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर

Jacqueline Fernandez | बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला जामीन मंजुर, पण पाळावी लागणार ‘ही’ अट

 

Related Posts