IMPIMP

Jacqueline Fernandez | बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला जामीन मंजुर, पण पाळावी लागणार ‘ही’ अट

by nagesh
Jacqueline Fernandez | jacqueline fernandez bail case hearing in 200 cr money laundering case

सरकारसत्ता ऑनलाईन मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Bollywood Actress Jacqueline Fernandez) पटियाला हाऊस कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर जॅकलिनची 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात (200 Crore Fraud Case) जामिनावर निकाल देताना निर्दोष मुक्तता झाली आहे. खरतर 11 नोव्हेंबरलाच जॅकलिनच्या जामिनावर निर्णय होणार होता. परंतु न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान जॅकलिनचा (Bollywood Actress Jacqueline Fernandez) अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरलाच संपला. त्यामुळे हा निकाल देताना न्यायालयाने जॅकलीनची दोन लाखांच्या जामीनाच्या जातमुचलक्यावर निर्दोष मुक्तता केली आहे. जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरसोबत (Jacqueline And Sukesh Chandrasekhar) फसवणूक प्रकरणात जामीन मिळाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याआधी देखील जॅकलिन अंतरिम जामिनावर होती. यानंतर तिने नियमित जामिनासाठी अर्ज केला. परंतु ईडीने 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत जॅकलिनच्या जामिनाला विरोध केला होता. जॅकलिन पुराव्यांशी छेडछाड करू शकते असं ईडीच म्हणण होत. त्याचवेळी जॅकलिनच्या वकिलाने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.इतकच नाही तर जॅकलिनने ईडीवर छळ केल्याचा आरोप केला होता.दरम्यान न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयात जॅकलिनला परदेशात जाण्यासाठी सूटही न्यायालयाने दिली आहे.तसेच कोर्टाने 24 नोव्हेंबर ही पुढील तारीख निश्चित केली आहे.त्यावेळी जॅकलीनवरील आरोप निश्चित करण्यावर चर्चा होईल.

 

 

नेमका काय आरोप आहे जॅकलिनवर ?
२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या जवळची व्यक्ती म्हणुन जॅकलिन होती. दरम्यान या रकमेचा फायदा घेत फसवणूक केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. तर दुसरीकडे जॅकलिन म्हणते की, ती स्वतः या प्रकरणाची बळी आहे. इतकतच नाही तर जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आहेत. तसेच दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. महत्वाची बाब म्हणजे जॅकलिनला खूश करण्यासाठी सुकेश तिला महागडे गिफ्ट्स द्यायचा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

तसेच जॅकलिनदेखील सुकेशशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत होती. तसेच काही दिवसांपूर्वी सुकेशने जेलमधून पत्र लिहून जॅकलीन निर्दोष असल्याचे सांगितले होते.
सुकेशने लिहिले की, जॅकलीनला फक्त त्याच्याकडून प्रेम हवे होते. त्यांनी जॅकलिनला पीएमएलए अंतर्गत दोषी ठरवले हे दुर्दैव आहे.
दरम्यान आता या अभिनेत्रीला कोर्टातून दिलासा मिळाल्याने आता या प्रकरणात काय निष्पन्न होते हे पाहावे लागेल.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez bail case hearing in 200 cr money laundering case

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | “परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही…”; अजित पवारांचा इशारा

Pune Pimpri Crime | तुला मस्ती आली का? जावयाने केला सासूचा विनयभंग; चिखली परिसरातील घटना

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

 

Related Posts