IMPIMP

Gold Price Today | चांदी 1,200 रुपयांनी महागली, सोने सुद्धा वाढून 51 हजारच्या जवळ, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

by nagesh
Gold Price Today | gold price surge to reach near 51 thousand rupee silver gain about rs 1200

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाGold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात आज जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. तेजीमुळे जागतिक बाजारात गुरुवारी सकाळी चांदीच्या वायदा किमतीत जोरदार उसळी दिसून आली आणि तिचा भाव 56 हजारांच्या पुढे गेला, तर सोन्याचा भाव 51 हजारांच्या जवळ पोहोचला. (Gold Price Today)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सोन्याच्या भावात आज तेजी (Gold Price Today)

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वायदा भाव 178 रुपयांनी वाढून 50,898 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याआधी सोन्यात व्यवहाराची सुरूवात 50,760 रुपयांवर झाली होती, मात्र मागणी वाढल्याने भावात तेजी दिसून आली. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.35 टक्क्यांनी वाढले आहे.

 

चांदीमध्ये जोरदार उसळी (Silver Price Today)

सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही उसळी दिसून आली आणि त्याचा भाव 56 हजारांच्या पुढे गेला. एमसीएक्सवर, चांदीची वायदा किंमत सकाळी 1,189 रुपयांनी वाढून 56,033 वर पोहोचली. यापूर्वी चांदीत व्यवहाराला सुरूवात 55,345 वर झाली होती, मात्र मागणी वाढताच भावात बंपर उसळी आली आणि भाव 56 हजारांच्या वर गेला. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 2.17 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.

 

जागतिक बाजारात काय आहे भाव

जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याचा हाजीर भाव 1,736.55 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे, जो मागील बंद भावाच्या तुलनेत 0.15 टक्के कमजोर आहे. त्याच वेळी, चांदीचा हाजीर भाव आज 19.26 डॉलर प्रति औंस आहे, जोमागील बंद भावापेक्षा 0.56 टक्के जास्त आहे. यामुळेच आज भारतीय वायदा बाजारात चांदीच्या किमतीने जोरदार झेप घेतली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोन्याने तेजीचा मार्ग धरला का ?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सोन्यावर दबाव असला तरी महागाई आणि मंदीची जोखीम कमी होताच सोन्याला पुन्हा एकदा तेजी येईल.
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की,
या वर्षाच्या अखेरीस सोने 54 हजारांची पातळी गाठू शकते.
मात्र, त्यांनी बाजारातील अस्थिरतेचाही उल्लेख केला आणि त्यात घसरण झाल्यास सोन्याचा भाव 48 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे सांगितले.

 

Web Title : –  Gold Price Today | gold price surge to reach near 51 thousand rupee silver gain about rs 1200

 

हे देखील वाचा :

Cholesterol Lowering Drinks | ‘या’ 4 नॅचरल ड्रिंक्सच्या मदतीने कमी होईल कोलेस्ट्रॉल, रोज प्यायची सवय करा

CM Eknath Shinde | संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचा टोला, म्हणाले – ‘त्यांना स्वप्नातच…’

ITR Update | शेअर बाजारात झालेल्या नुकसानीवर टॅक्स सूट मिळेल का ?, काय सांगतो प्राप्तीकर कायदा ? एक्सपर्टकडून जाणून घ्या पूर्ण गणित

 

Related Posts