IMPIMP

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

by nagesh
Gold Silver Prices | Today's Gold Silver Prices In India

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Gold Rate Today | आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी, पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices)
वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर (Indian Market) होत असतो. सध्या महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस आहेत. या निमित्ताने अनेकजण
सोने-चांदी खरेदी (Gold Rate Today) करत असतात. आज सोन्याच्या दरात वाढ झाली नसली तरी चांदीच्या दरात किंचीत वाढ झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज बुलियन्स वेबसाईट नुसार सोन्याचे फ्युचर्स 0.25 टक्क्यांनी कमी होऊन आज 24 कॅरेट सोन्याचे दर (24 Carat Gold Rate) 50,610 रुपये आहे.
तर एक किलो चांदीचा दर (Silver Rate) 54,030 रुपयांवर व्यवहार करत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर. (Gold Rate
Today)

 

 

मुंबईत आज सोने 46, 393 तर एक किलो चांदीचा दर 54,030 रुपये आहे. पुणे, नाशिक नागपूर या शहरांमध्ये सोने 46,411 रुपये तर चांदी 54,030
रुपये आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये सोने 46,328 रुपये प्रति 10 ग्रॅम असून चांदी 53,960 रुपये प्रति किलो आहे. कोलकाता मध्ये सोन्याचा आजचा दर
46,328 रुपये तर चांदी 54 हजार रुपये प्रति किलो आहे.

 

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

 

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर,
फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

 

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने
बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22
कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

 

या ठिकाणी करा तक्रार

 

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप तयार केले आहे. BIS Care APP  द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू
शकता. या अॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता नाही तर त्याबाबत कोणतीही तक्रार करु शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक
चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्यासंदर्भात तात्काळ तक्रार करु शकतात.

 

Web Title: Gold Rate Today | Gold prices were ‘as they were’, while silver rose; Know today’s rates in your city

 

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | ‘मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा भाई’ असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही रेशन, कार्ड सुद्धा होईल रद्द!

Pune Accident News | चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यु

Pune Ganeshotsav 2022 | गणेश विसर्जनासाठी यंदा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही – जलसंपदा विभागाची स्पष्टोक्ती

 

Related Posts