IMPIMP

Gondia Accident | कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू, गोंदिया मधील घटना

by nagesh
Gondia Accident | four youths died on the spot in an accident gondiya accident crime news

गोंदिया : सरकारसत्ता ऑनलाइन Gondia Accident | काम संपवून घरी परतत असताना कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात (Gondiya Accident) बुधवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात (Sadak Arjuni Tahasil) खोबा गावाजवळ झाला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेत रामकृष्ण बिसेन (24), सचिन कटरे (24), संदीप सोनवाने (18), निलेश तुरकर (27) यांचा मृत्यू झाला आहे तर, 24 वर्षीय तरूण प्रदीप बिसेन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (Gondia Accident)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मृतक गोंदिया जिल्ह्यातील (Gondiya District) आमगाव तालुक्यातील (Amgaon Tahasil) रहिवासी होते.
बुधवारी रात्री ते तालुक्यातील नवेगावबांध परिसरात सोलर पंप फिटिंगच्या (Solar Pump Fitting) कामाकरीता गेले होते.
काम संपल्यानंतर ते कारने परतत असताना कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या खाली कोसळली.
अपघात इतका मोठा होता की, कार पूर्णपणे चकनाचूर झाली. यात गंभीर जखमी झालेल्या चारजणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : –  Gondia Accident | four youths died on the spot in an accident gondiya accident crime news

 

हे देखील वाचा :

Changes In PPF | व्याजदर वाढण्यापूर्वी PPF अकाऊंटमध्ये सरकारने केले बदल; जाणून घेतले नाही तर होईल नुकसान

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदारांची घेतली भेट

दर महिन्याला रिचार्ज करण्याचे टेन्शन संपले! ‘हे’ आहेत Jio-Airtel-Vi-BSNL चे सर्वात स्वस्त प्लान जे देतात 365 दिवसांची वैधता

 

Related Posts