IMPIMP

Governor Bhagat Singh Koshyari | छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, माफी मागण्याचं टाळलं

by nagesh
Maharashtra Political Crisis | maharashtra state government will give 12 governor appointed mla list to governor bhagat singh koshyari

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन‘समर्थ रामदास’ (Samarth Ramdas) यांच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना कुणी विचारलं असतं? असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन राज्यात नवं वादंग सुरु झालं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी माफी (Apology) मागावी अशी मागणी करण्यात आली. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत असल्यामुळे अखेरीस राज्यपालांनी याबाबत स्पष्टीकरण (Explanation) दिले आहे. पण, माफी मागण्याबद्दल त्यांनी नकार दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University Jalgaon) क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे (Swimming Pool) उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधानाबद्दल (Statement) विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

 

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहेत. माझा माहिती व अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले आहेत, तर मी ती तथ्यं पुढे तपासून घेईन, असं म्हणत त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. यावेळी पत्रकारांनी आपल्या विधानाबाबत माफी मागणार का असे विचारले असता, माफी मागण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी बगल देत काढता पाय घेतला. त्यांनी माफी मागण्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देताच निघून गेले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?
महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय (Chanakya) चंद्रगुप्ताला (Chandragupta) कोण विचारेल,
समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही.
प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरुचे मोठे स्थान असते.
शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे,
अशा आशयाचे विधान राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना केले होते.

 

Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari | Governor Bhagat Singh Koshyaris explanation on shivaji maharaj and samarth samradas statement avoidance of apology

 

हे देखील वाचा :

ICAI Pune | आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे; उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे यांची निवड

Sharad Pawar | राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा सभेतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

PMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप कडून हेमंत रासने यांना चवथ्यावेळी संधी; महाविकास आघाडीकडून प्रदीप गायकवाड उमेदवार

 

Related Posts