IMPIMP

Sharad Pawar | राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा सभेतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

by nagesh
NCP chief Sharad Pawar | ncp sharad pawar slams modi government over maharashtra karnataka

सरकारसत्ता ऑनलाइन – Sharad Pawar | राज्याचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राजकीय वर्तुळातून निशाणा साधला जात आहे. त्यासोबतच शिवप्रेमींनीही राज्यपालांबाबत संताप व्यक्त केला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

या व्हिडीओमध्ये शरद पवार एका सभेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण याबाबत ते सांगत आहेत. व्हिडीओमध्ये, जे लोक सांगतात रामदास स्वामी (Ramdas Swami) महाराजांचे गुरू होते, ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजामाता होत्या. महाराजांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्यांचे गुरू रामदास नव्हते, असं शरद पवार (Sharad Pawar) सांगत आहेत.

 

 

त्यासोबतच, ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी ही कमाल केली. कारण त्यांनीच इतिहासात महाराजांचे गुरू रामदास असल्याचं लिहून ठेवल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. राज्यभरातून भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका केली जात आहे. राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) आणि भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असं सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या.
तर, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास (Ramdas Swami) हे कधीही गुरु नव्हते.
हा खरा इतिहास (History) आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे.
त्यामुळे शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असल्याचं उदयनराजे भोसले (MP UdayanRaje Bhosle) यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | Sharad Pawar’s video goes viral on the background of the Governor’s statement!

 

हे देखील वाचा :

PMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप कडून हेमंत रासने यांना चवथ्यावेळी संधी; महाविकास आघाडीकडून प्रदीप गायकवाड उमेदवार

Kangana Ranaut Bold Dress Photo | कंगनानं कॅमेरासमोर घातले जाळीदार कपडे, फोटोतील कपड्यांनी चाहत्यांचं ओढून घेतलं लक्ष..

Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये कर्ज सुविधा, टॅक्स बेनेफिट आणि 7 टक्केपेक्षा जास्त व्याज; तुम्ही लाभ घेऊ शकता का?

 

Related Posts