IMPIMP

Gram Panchayat Election Results | ‘एकनाथ शिंदेंची भीती खरी ठरली’, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

by nagesh
Gram Panchayat Election Results | bjp leader ashish shelar trolled shivsena chief uddhav thackeray over eknath shinde predictions of ncp

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल (Gram Panchayat Election Results) आज जाहीर झाला आहे. या निकालाची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळात लागली होती. कारण महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) गेल्यानंतर राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) काळातली ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील एकूण 608 ग्रामपंचायतींपैकी 51 ग्रामपंचायतींमधील निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे उर्वरित 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आज मतमोजणी (Gram Panchayat Election Results) झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात (Gram Panchayat Election Results) भाजपला (BJP) राज्यभरात मोठे यश मिळाले आहे. भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्विकारतो. जनतेची सेवा आणखी दुप्पट वेगाने करु, असा व्यक्त करतो. पण महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) शिवसेनेला संपविण्याचा घाट असल्याचे पुन्हा सिद्ध झाले, असे भाजप नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी म्हटले.

 

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष हा राज्यातला दोन नंबरचा पक्ष झाला असून शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला आहे.
हीच भीती, संशय आणि आरोप एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बोलून दाखवली होती.
आणि ती भीती खरी ठरली. राष्ट्रवादीने शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
किमान आतातरी उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील, अशी आशा करुया, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी ठाकरेंना लगावला.

 

भाजपकडे पहिल्यांदाही मराठी मतं (Marathi Votes) होती, आजही आहेत.
ज्यावेळेला शिवसेनेने असा दावा करायला सुरुवात केली की, गणेशोत्सव म्हणजे आम्ही, दहीहंडी म्हणजे आम्ही,
त्यांना आता भाजपने सत्याचा आरसा दाखवला आहे. भाजप सणात कधीच राजकारण आणत नाही.
सणात केवळ आम्ही सहभागिता देतो, असेही शेलार यांनी नमूद केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gram Panchayat Election Results | bjp leader ashish shelar trolled shivsena chief uddhav thackeray over eknath shinde predictions of ncp

 

हे देखील वाचा :

Diabetes आणि Heart च्या पेशंटने करावे ‘या’ पाण्यातील वनस्पतीचे सेवन, आरोग्याचे टेन्शन होईल दूर

Jayant Patil | शिंदे-फडणवीस सरकारबाबत जयंत पाटलांचे मोठं भाकित, म्हणाले – ‘याच’ दिवशी सरकार बरखास्त होईल’

Pune Pimpri Crime | साईरंग डेव्हलपर्सच्या के.आर. मलिक यांच्यासह मुलावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

Related Posts