IMPIMP

Jayant Patil | शिंदे-फडणवीस सरकारबाबत जयंत पाटलांचे मोठं भाकित, म्हणाले – ‘याच’ दिवशी सरकार बरखास्त होईल’

by nagesh
Jayant Patil | suspension of ncp leader jayant patil till the end of winter session

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) हे सध्या मराठवाडा विभागाच्या (Marathwada Division) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नगर आणि औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) कधी कोसळणार याचे भाकित देखील केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, भाजपच्या (BJP) गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की सरकार बरखास्त होईल. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना आपण किती मोठी चूक केली हे समजेल. हे सरकार टिकणार नाही. म्हणूनच प्रशासन सुद्धा सरकारचं ऐकत नाही. या सरकारची प्रशासनावरची पकड मजबूत नाही, असं भाकीत पाटील यांनी केलं.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ 40 मतदार संघापुरत्या विविध घोषणा करत आहेत.
उरलेल्या मतदारसंघाचे काय? कोणत्याही घोषणेचे जीआर नाहीत. तसेच आदेशही नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिखित भाषण वाचतात, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. तिन्ही पक्ष कुठ एकत्रित लढतील याबाद्दल स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Jayant Patil | ncp leader jayant patil claims that shinde government will collapse very soon

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | साईरंग डेव्हलपर्सच्या के.आर. मलिक यांच्यासह मुलावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

MNS Chief Raj Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…

Jayant Patil On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जाणार का? जयंत पाटील यांनी दिले हे उत्तर, म्हणाले…

Sushilkumar Shinde | कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला घरचा आहेर

 

Related Posts