IMPIMP

Gujarat Election Results | गुजरात निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले ‘या’ राज्यांकडे पाहता देशात हळूहळू बदल…’

by nagesh
Gujarat Election Results | Sharad Pawar's Comment on Gujarat Election Results; He said, 'Looking at these states, the country is gradually changing...'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Gujarat Election Results | देशातील सार्वत्रिक निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुका होऊन दोन तीन वर्षे झाली की, भारतीयांना येत्या निवडणुकांची चिंता सतवायला लागते. चालू सरकार पुन्हा येईल की, विरोधी पक्ष बाजी मारणार या विचारांनी भारतीय नागरिक त्रस्त झालेला असतो. सुदैवाने भारतात दर सहा महिन्यांना निवडणूक होत असल्याने ‘जनतेचा मूड’ किंवा ‘देशाचं वारं’ कोणत्या दिशेने वाहत आहे, हे पाहणे सोप्पे ठरते. मग निवडणुकांचा निकाल मनासारखा लागला तर स्वीकारायचा किंवा मनाविरुद्ध लागला की नाकारायचा, ही तर रोजची गोष्ट आहे. पण या निवडणुका येत्या निवडणुकीची दशा किंवा दिशा सांगतात की नाही, हे गूढ अजून उकलेले नाही. (Gujarat Election Results)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज (८ डिसेंबर) गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, या निवडणुकीत भाजपने सलग सातव्या वेळेस गुजरातमध्ये सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर राजकीय स्तरावर या निकालाबद्दल प्रतिक्रिया येत असून, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या निकालाच्या आधारे २०२४ च्या निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज बांधत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar reaction on Gujarat Results 2022) यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली. हा निकाल म्हणजे देशात एका बाजूने मतप्रवाह आहे असं नाही, असे शरद पवार म्हणाले.

 

पवार म्हणतात, “देशात एक वेगळं वातावरण आहे, नुकतेच निवडणुका पार पडल्या. या निवडणुका एक वेगळी दिशा दाखवायला लागल्या आहेत. कुणाच्याही मनात गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल शंका नव्हती. एका राज्याच्या सोयीसाठी अनेक निर्णय घेतले गेले. त्या राज्यात अनेक प्रकल्प कसे जातील याची काळजी घेण्यात आली. त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं, तसा निकाल आता पाहायला मिळत आहे. पण गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशात एका बाजूने मतप्रवाह आहे असा नाही. कारण दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आपने खेचून आणली.” (Gujarat Election Results)

 

पुढे दिल्ली आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा आधार घेत शरद पवार यांनी भारतात बदल होत असून, भाजप सत्ता गमावत आहे, असा अंदाज लावला. ते म्हणाले, “भाजपचं हिमाचलमध्ये राज्य होतं आता काँग्रेसला त्या ठिकाणी जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपचं राज्य गेलं आहे. दिल्लीमध्ये गेलं, पंजाबमध्येदेखील गेलं आहे आणि आता हिमाचलमध्येदेखील राज्य गेलं आहे. याचा अर्थ म्हणजे हळूहळू आता बदल होत आहे. राजकारणात पोकळी अनेक वेळा असते. गुजरातची पोकळी भाजपने भरून काढली आणि केजरीवालांनी दिल्लीची पोकळी भरून काढली. अनेक लोकांना देशात बदल हवे आहेत, याची राजकीय कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायला हवी. ही पोकळी कशी भरून काढायची याचा विचार करायला हवा. ही पोकळी आता लवकरच भरून काढण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे. आता आपल्याला एकत्र येऊन राजकारण करणे गरजेचे आहे. आपण कमीत कमी भाजपच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध असणाऱ्या शक्ती एकत्रित कशा करायच्या याची तयारी केली पाहिजे.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

“राष्ट्रवादीने विरोधी पक्षांच्या मीटिंगसाठी पुढाकार घेतला, आपण इथेदेखील पुढाकार घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत,
हेच आता कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायचय की, आपण ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
सर्वांनी त्यासाठी तयार राहिलं पाहिजे.
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत, म्हणून दुर्लक्ष नाही करायचं.
आपलं काम आपण चालूच ठेवलं पाहिजे. या निवडणुकीत नवी पिढी कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.
ही निवड करताना शक्यतो त्या ठिकाणचा जो तरुण कार्यकर्ता आहे त्याला डावलू नये, त्याला संधी दिली पाहिजे.
निकाल पार पडल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात यायला हवं की, राष्ट्रवादीने दुसरी फळी तयार केली आहे,” असे शरद पवार म्हणाले.

 

आता शरद पवारांचा आशावाद आणि प्रयत्न किती फायदेशीर ठरेल हे २०२४ मध्ये तुम्हीच ठरवाल.

 

Web Title :- Gujarat Election Results | Sharad Pawar’s Comment on Gujarat Election Results; He said, ‘Looking at these states, the country is gradually changing…’

 

हे देखील वाचा :

Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा

Gujarat Elections Result | “काही लोक संपादक आहेत की, पादक हे बघावं लागेल”; आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या

 

Related Posts