IMPIMP

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या

by nagesh
SC On Property Dispute | hen gifting assets write kids must look after you sc

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SC On Property Dispute | अनेकदा प्रेमापोटी वृद्ध आई-वडील त्यांची संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करून टाकतात.
पण, त्यानंतर जर मुलांनी त्यांचा सांभाळ केला नाही तर त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. या घटनांचे वाढलेले प्रमाण पाहता माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात ज्येष्ठ नागरिकांना एक सल्ला दिला आहे. मुलांच्या नावावर संपत्ती करताना त्यांच्याकडून तुमची म्हातारपणी काळजी घेतील, असे
आश्वासन लिखित स्वरूपात घ्यावे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांना दिला आहे. (SC On Property Dispute)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

न्यायमूर्ती संजय के कौल आणि ए एस ओका यांच्या खंडपीठाने मंगळवारी एका याचिकेची सुनावणी करताना त्यांनी हा सल्ला दिला. वृद्धापकाळात पालकांकडे त्यांची मुले दुर्लक्ष करतात. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, २००७ लागू करणार्‍या समर्पित न्यायाधिकरणाकडे जाण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही फक्त गिफ्ट डीड म्हणून मुलांना दिलेली मालमत्ता रद्द करता येते. (SC On Property Dispute)

 

याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी पार पडली. गुरुग्राममधील एका आईने काही मालमत्ता तिच्या मुलांना भेट दिली होती. त्यानंतर मुले तिची काळजी घेत नसल्याचा आरोप करत तिने गिफ्ट डीड रद्द करण्यासाठी मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे धाव घेतली. न्यायाधिकरणाने मे २०१८ मध्ये गिफ्ट डीड रद्द केले. आता, या केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती.

 

Web Title :- SC On Property Dispute | hen gifting assets write kids must look after you sc

 

हे देखील वाचा :

New WhatsApp Feature-Meta | मेटाची नवी घोषणा व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना मिळणार हे नवीन फीचर

Nashik Crime | नाशिक-सिन्नर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारांना चिरडत एसटीने घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू

PSI And Police Personnel Suspended | विनयभंगाच्या गुन्ह्यात मदतीसाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी तडकाफडकी निलंबित

 

Related Posts