IMPIMP

Chandrashekhar Bawankule | पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार?, बावनकुळे म्हणाले -‘आमची त्यांना विनंती आहे की…’

by nagesh
Maharashtra Political News | congress nana patole replied bjp and chandrashekhar bawankule on rahul gandhi visit in maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले (BJP MP Girish Bapat Passed Away) आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता पोटनिवडणूक (Pune Lok Sabha By-Election) होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही हा मविआचा प्रश्न आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले. तसेच आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी उमेदवार देऊ नेये, असंही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवारांची भूमिका कौतुकास्पद

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सर्वात आधी संजय राऊत नावाचा सकाळी नऊ वाजताचा भोंगा बंद करावा. राज्यात दंगली सारख्या घटना होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. अशीच भूमिका इतर नेत्यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. मात्र दुर्दैवाने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या सारखे नेते प्रक्षोभक वक्तव्य करुन आगीत तेल टाकण्याचे काम करत असल्याची घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली आहे.

 

 

मविआ पोटनिवडणूक लढवणार -विजय वडेट्टीवार

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी म्हटले की,
आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहोत.
तसेच भाजपने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत.
त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवेन, असे वडेट्टीवर यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | pune lok sabha by election likely to be uncontested

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | रोहित माझ्या मुलासारखा, मी असं का करु?, अजित पवारांची स्पष्टोक्ती

Ready Reckoner Rate | 2023-24 मध्ये रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ नाही? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | ‘पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार’, विजय वड्डेटीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावले, म्हणाले-‘माणुसकी नावाचा प्रकार आहे की…’

 

Related Posts