IMPIMP

Hardik Pandya | हार्दिक पांड्यामुळे बिहारच्या ‘या’ तरुणाचे बदलले नशीब, रातोरात बनला कोट्याधीश

by nagesh
Hardik Pandya | hardik pandya changed the fate of the youth of bihar become a millionaire overnight

बिहार: वृत्तसंस्था – Hardik Pandya | रातोरात नशीब बदलल्याच्या अनेक बातम्या आपण पाहत असतो. अशीच एक घटना बिहारच्या (Bihar) आरा येथे राहणाऱ्या सौरभ कुमारच्या (Saurabh Kumar) बाबतीत घडली आहे. पण यामागचे कारण होते क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) विद्यार्थ्यांचे क्लासेस घेणारा सौरभ दोन वर्षापासून ऑनलाईन क्रिकेट गेम (Online Cricket Game) मध्ये नशीब आजमावत होता. नेहमीप्रमाणे त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातही (India-Australia Matches) संघ बनवला आणि हाच संघ त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सौरभ गेल्या कित्येक वर्षापासून ऑनलाईन क्रिकेट गेम मध्ये टीम तयार करून पैसे गुंतवत होता. मंगळवारी संध्याकाळी ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या T-20 मालिकेतील सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), के एल राहुल (KL Rahul), अक्षर पटेल (Akshar Patel), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), गोलंदाज उमेश यादव (Bowler Umesh Yadav) आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडू यष्टीरक्षक एमएस स्मिथ (MS Smith), टी. डेव्हिड (T. David), सी ग्रीन, गोलंदाज जे हेझली ओड आणि नॅथन इलेस यांच्या चांगल्या प्रदर्शनावर नशीब आजमावलं होतं.
पण हार्दिक पांड्याच्या शानदार फलंदाजीने त्याचे नशीबच पालटले.

 

हा सामना संपल्यानंतर सौरभला एक कोटी रुपये जिंकल्याचा मेसेज देखील आला.
सुमारे 30 लाख रुपये कर कापून त्याच्या खात्यात 70 लाख रुपये जमा झाल्याचा मेसेजही त्याला मिळाला.
यानंतर हि गोष्ट वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. आणि या तरुणाचे नशीबच पालटले.

 

 

Web Title :- Hardik Pandya | hardik pandya changed the fate of the youth of bihar become a millionaire overnight

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar On Raj Thackeray | मनसेच्या टीकेनंतर शरद पवारांनी मोजक्या शब्दात राज ठाकरेंना सुनावले; म्हणाले – हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांच्या जिव्हारी, म्हणाले – अडीच वर्षांत तिघे मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढे…

Pune Crime | चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या 48 वर्षाच्या नराधमाला अटक

 

Related Posts