IMPIMP

Sharad Pawar On Raj Thackeray | मनसेच्या टीकेनंतर शरद पवारांनी मोजक्या शब्दात राज ठाकरेंना सुनावले; म्हणाले – हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…

by nagesh
Raj Thackeray | ncp used shivaji maharaj name for caste politics say raj thackeray targeted sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Sharad Pawar On Raj Thackeray | मनसे (MNS) नेते मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका करत आहेत. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar On Raj Thackeray) यांनीच उत्तर देत राज ठाकरे यांना मोजक्या शब्दांमध्ये सुनावले आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनसेकडून असा आरोप केला जातो की शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणीसंग्रहालयातील मांजर आहे. या राजकीय वक्तव्याकडे तुम्ही कसे पाहता? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता पवार म्हणाले, प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात आमदार निवडून आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचे.

 

मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले होते
की, शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजर्‍यातील मांजर आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, त्याबद्दल शिवसेना काही बोलणार का? या टीकेवरून शरद पवार यांनी आज मनसेचा समाचार घेतला.

 

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर टीका करताना
आज म्हटले आहे की, राष्ट्रवादीची उपशाखा असलेल्या नवाबसेनेने शिवतिर्थावरील टोमणे मेळाव्यासाठी हिंदूत्वाची
वचनपूर्ती असे पोस्टर लाँच केले आहे. नवाब सेनेच्या नवाब प्रमुखांनी आदरणीय बाळासाहेबांची भाषणे, मुलाखती
आणि पत्रकार परिषदा परत एकदा ऐकण्याची गरज आहे.
त्या जर आपल्याकडे नसतील तर आम्ही त्या तुमच्याकडे पाठवू.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गजानन काळे यांनी शिवसेनेवर टीका करताना पुढे म्हटले की, सत्तेत आल्यावर हिंदुत्व गुंडाळून काँग्रेस,
राष्ट्रवादीची लाचारी करायची व सत्ता गेल्यावर हिंदुत्वाची आरोळी ठोकायची. यांची ही भूमिका म्हणजे दुतोंडी आहे.

 

 

Web Title :- Sharad Pawar On Raj Thackeray | After MNS’s criticism, Sharad Pawar told Raj Thackeray in few words; Said – even as many as can be counted on the fingers of the hand…

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांच्या जिव्हारी, म्हणाले – अडीच वर्षांत तिघे मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढे…

Pune Crime | चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या 48 वर्षाच्या नराधमाला अटक

Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन महिलेवर अत्याचार करुन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts