IMPIMP

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…

by nagesh
Hasan Mushrif | hasan mushrif reaction on joining bjp offer given by chandrakant patil ed raid in kagal and pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पुणे आणि कागल येथील घरांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या या कारवाई नंतर हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी यावेळी बोलताना भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भाजपप्रवेशाबाबत दिलेल्या ऑफरबद्दल विचारले असता, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हसत हसत तो विषय टाळला. तोच प्रश्न त्यांना पुन्हा विचारला असता, हसन मुश्रीफ यांनी ‘असं कसं होईल’ अस उत्तर दिले. त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या ऑफरबाबत कुठलीही स्पष्ट भूमिका न मांडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.

 

दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले की, ‘आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीने माझ्या निवासस्थानी, मुलांच्या आणि मुलीच्या घरावर, मुलांच्या कारखान्यावर छापे टाकले.
पुण्यातही काही व्यक्तींच्या घरावर ईडीने छापेमारी केली.
ही कारवाई करण्याआधी ईडीने मला कोणत्याही प्रकारची नोटीस अथव समन्स बजावला नव्हता.
संबंधित कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही. या कारखान्यावर चार वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले.
तपासण्या झाल्या.’ असे ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

 

तसेच किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना ते (Hasan Mushrif) म्हणाले की.
‘किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत मी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली आहेत.
तो खुलासा केल्यानंतरही किरीट सोमय्यांनी माझ्यावर तेच आरोप परत केले आहेत.
त्यामुळे किरीट सोमय्या यांच्याविरोधात दीड कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला असून हे प्रकरण
न्यायप्रविष्ट आहे.’ अशी माहिती यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Hasan Mushrif | hasan mushrif reaction on joining bjp offer given by chandrakant patil ed raid in kagal and pune

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून ठाकरे गटातील आमदारांमध्ये नाराजी

Devendra Fadanvis | ‘मागचं सरकार फेसबुकवर लाईव्ह होतं अन् जनतेत मृत होतं’; देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाविकास’ सरकारवर हल्लाबोल

Ajit Pawar | हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवार म्हणाले – ‘माझं स्पष्ट मत आहे, आत्ता जे घडत आहे त्याला…’

 

Related Posts