IMPIMP

Nana Patole | नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप! म्हणाले ‘देशातील तरुण पिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे….’

by nagesh
Nana Patole | ambedkar thackeray alliance has nothing to do with maha vikas aghadi nana patole reacts

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन आपल्या भारत देशाकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जाते. देशात 16 ते 40 वयोगटातील नागरिकांची संख्या 50
टक्केच्या वर आहे. ही तरुण पीढी देशाचे भवितव्य आहे. पण देशातील 10 ते 17 वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधिन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र
सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहे. त्यामुळे या गोष्टीची दाहकता आपल्या लक्षात येते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)
म्हणाले आहेत. तसेच केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ड्रग्सच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असा दावा
नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

 

देशातील तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे, ही अत्यंत गंभीर बाब असून, हे देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. देशात मागील काही वर्षांत अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. देशाने गुजरातच्या मुंद्रा खासगी बंदरात हजारो किलो ड्रग्स आल्याचे पाहिले होते. या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. जेएनपीटी बंदरात अमली पदार्थांचा साठा असलेला कंटेनर जप्त करण्यात आला होता. बंगरुळुमध्येही तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याच्या घटना अलीकडे उघड झाल्या आहेत. देशात वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी राजरोस होत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यास केंद्र सरकारला आणि यंत्रणांना अपयश आल्याचे या घटनांवरून दिसते, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकीकडे ही गंभीर बाब असताना मात्र, दुसरीकडे मुंबईत काही सिलेब्रिटींच्या घरी चार – पाच ग्रॅम ड्रग्ज सापडल्यावर रान उठवले जाते.
जणू काय संपूर्ण मुंबई शहरच नशेखोर लोकांचे शहर आहे, असा प्रचार केला जातो.
महाविकास आघाडीच्या काळात भाजपच्या लोकांनी हा दुष्प्रचार केला होता.
हजारो टन अमली पदार्थ न रोखू शकणारे दोन चार ग्रॅम गांजावर मोठा आकांडतांडव करत होते.
देशात नशा करणाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येत असलेले अपयश ही चिंतेची बाब आहे.
राजकारणापेक्षा हा देशाच्या भवितव्याचा प्रश्न असून, केंद्र सरकारने यात तातडीने लक्ष घालावे.
तसेच नशेच्या आहारी जात असलेल्या पिढीला त्यापासून परावृत्त करावे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.

 

Web Title :- Nana Patole | since the bjp government came to the center there has been an increase in drug trafficking in the country nana patole

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | जी २० परिषदेच्या निमित्ताने सुशोभिकरण आणि दुरूस्तीची कामे 5 जानेवारीपर्यंत पूर्ण करणार; पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेचे आश्‍वासन

Supreme Court | लाच मागितल्याचा थेट पुरावा आवश्यक नाही- सर्वोच्च न्यायालय

Pune PMC News | फ्लॅट ताब्यात देण्यापुर्वीचा मिळकत कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍या बिल्डरविरूध्द ‘रेरा’ कडे तक्रार करणार : मनपा आयुक्त विक्रम कुमार

Maharashtra Politics | शिरूर तालुक्यात भाजपची मोठी खेळी; राष्ट्रवादीला शह देण्यासाठी फडणवीसांचा शिलेदार मैदानात?

 

Related Posts