IMPIMP

Heart Disease | आठवड्यातून 2 दिवस करा ‘या’ फळाचे सेवन, कमी होऊ शकतो हार्ट अटॅक-फेल्युअरचा धोका

by nagesh
Heart Disease | eating avocados twice a week can lower the risk of heart disease know the expert opinion

सरकारसत्ता ऑनलाइन – Heart Disease | एवोकॅडो (Avocado) हे नाशपातीच्या आकाराचे फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. (Heart Disease)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ए, बी, सी, ई, के जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेले अ‍ॅव्होकॅडो गेल्या काही वर्षांत स्मूदी किंवा टोस्ट टॉपिंग म्हणून अधिक लोकप्रिय झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात आरोग्यासाठी उपयुक्त एवोकॅडोबद्दल असा दावा करण्यात आला आहे की आठवड्यातून दोनदा किंवा जास्त वेळा त्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका पाच पटीने कमी होतो.

 

रिसर्चमध्ये झाला खुलासा :
अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून किमान दोनदा एवोकॅडो खातात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो, ज्यांनी कदाचित कधीही एवोकॅडो खाल्ले नव्हते. 30 वर्षांच्या संशोधनात, 110,000 हून अधिक आरोग्य कर्मचार्‍यांना आढळून आले की, एवोकॅडो हृदयविकारांपासून दूर ठेवते. (Heart Disease)

 

भूक नियंत्रित करते :
संशोधनानुसार जे लोक फॅटी अ‍ॅव्होकॅडो खातात त्यांना जास्त वेळ भूक लागत नाही आणि त्यांचे वजन नियंत्रणात राहते. सायन्स डेलीच्या रिपोर्टनुसार, लोणी, पनीर किंवा बेकन यांसारख्या पदार्थांऐवजी एवोकॅडोचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका 16-22 टक्क्यांनी कमी होतो. हे संशोधन 1 एप्रिल रोजी जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

 

अमेरिकेतील बोस्टन येथील हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या प्रमुख लेखिका डॉ. लोरेना पाशेको म्हणाल्या, प्लांट बेस्ड रिफाईंड फॅटचा वापर आहाराची गुणवत्ता सुधारू शकतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळू शकतो, याचा भक्कम पुरावा अभ्यास देतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोग्यासाठी कसे फायदेशीर हे फळ :
अ‍ॅव्होकॅडोमध्ये फायबर, फॅट विशेषत: मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आणि इतर अनुकूल घटक असतात जे चांगल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

 

क्लिनिकल चाचण्यांमध्ये आढळून आले आहे की उच्च कोलेस्ट्रॉलसह हृदयाशी संबंधित जोखीम घटकांवर अ‍ॅव्होकॅडोचा सकारात्मक प्रभाव पडतो.
संशोधकांच्या मते, हृदयविकार आणि पक्षाघातासंदर्भात संशोधन विशेष उपयोगी आहे.

 

हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर ठेवते :
संशोधनाच्या प्रमुख लेखिका, लोरेना एस. पाशेको यांच्या मते,
असंतृप्त चरबीच्या सेवनाने अन्नाची गुणवत्ता सुधारते आणि हृदयाशी संबंधित आजारांवर मात करण्यास मदत होते.
यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट डेटानुसार, यूएस मध्ये अ‍ॅव्होकॅडोचा वापर गेल्या 20 वर्षांमध्ये वाढला आहे.

 

एवोकॅडोमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसह असंतृप्त फॅटी अ‍ॅसिड असते, ज्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
एवोकॅडोमध्ये पोटॅशियम आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट जास्त असते. हृदयासाठी याचे अनेक फायदे आहेत.
हे बॅड कोलेस्टेरॉल देखील कमी करते आणि शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Disease | eating avocados twice a week can lower the risk of heart disease know the expert opinion

 

हे देखील वाचा :

Diabetes Ultrasound Treatment | ना औषध, ना इंजेक्शन, आता अल्ट्रासाऊंडने होईल डायबिटीजचा उपचार! शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश

Pune Crime | धक्कादायक ! पुणे-सातारा रस्त्यावरील लॉजवर नेऊन प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून

Diabetes Cure | डायबिटीजच्या रूग्णांच्या पायावर दिसू लागली ‘ही’ 4 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या काय असू शकते कारण

 

Related Posts