IMPIMP

PM Kisan | खुशखबर ! यावेळी शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 ऐवजी जमा होती 4000 रूपये, इथं यादीत तपासून घ्या तुमचं नाव

by nagesh
PM Kisan | good news pm kisan beneficiaries will get credit of rs 4000 instead of 2000 in 10th installment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्त्याचे पैसे येणार आहेत. जर शेतकरी दहाव्या हप्त्याची (10th installment) प्रतीक्षा करत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये त्यांच्या खात्यात येतील. याचा अर्थ असा आहे की, प्रधानमंत्री किसान (PM Kisan) सम्मान निधी योजनेंतर्गत रजिस्टर्ड शेतकर्‍यांच्या खात्यात सरकार दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये पाठवणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

तर, केंद्र सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला प्रधानमंत्री किसान सम्मान (PM Kisan) निधी योजनेंतर्गत पैसे ट्रान्सफर केले होते. आतापर्यंत
सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत.

या शेतकर्‍यांना मिळतील 4,000 रुपये

ज्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही त्या शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील, म्हणजे त्यांच्या खात्यात 4000
रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्याच शेतकर्‍यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे.

तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही तपासा

जर तुम्ही PM Kisan स्कीमसाठी रजिस्ट्रेशन केले आहे तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

यादीत असे चेक करा आपले नाव

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

अशाप्रकारे चेक करा स्टेटस

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

 

Web Title: PM Kisan | good news pm kisan beneficiaries will get credit of rs 4000 instead of 2000 in 10th installment

 

हे देखील वाचा :

High Court | परवानगी शिवाय दुसरा विवाह करणारा शिक्षेस पात्र, जाणून घ्या हायकोर्टानं नेमकं काय म्हंटलंय

Pune Crime | पुण्यात सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यु; पुण्याच्या बोपदेव घाटाजवळील घटना

 

Related Posts