IMPIMP

Hingoli News | नोटीस पाहण्यासाठी लाचेची मागणी, शेतकऱ्याच्या लेकानं इंग्रजीत काढली खरडपट्टी

by nagesh
Hingoli News | maharashtra hingoli employee asked for bribe of thousand to see notice farmer son answered him in english viral video

हिंगोली : सरकारसत्ता ऑनलाइन  – Hingoli News |  हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी शहरातील भूमि अभिलेख कार्यालयाचा (Land Records Office) भ्रष्टाचारी कारभार एका शेतकऱ्याच्या मुलाने समोर आणला आहे. शेतीच्या मोजणीची नोटीस पाहण्यासाठी एका अधिकाऱ्याने लाच (Bribe) मागितली असता, शेतकऱ्याच्या मुलाने इंग्रजी भाषेत त्याचा चांगलाच समाचार घेतला. हिंगोलीतील (Hingoli News) हा व्हिडीओ प्रसार माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातील दाती येथील शेतकरी पिता-पुत्र दत्तात्रय कदम (Dattatray Kadam) आणि त्यांचा मुलगा प्रमोद कदम (Pramod Kadam) हे शेतीच्या मोजणीच्या नोटीस संदर्भात कळमनुरीच्या भूमि अभिलेख कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. यावेळी तेथे उपस्थित अधिकाऱ्याने नोटीस पाहण्यासाठी 1000 रुपयांची लाच मागितली. त्यांनी नोटीस दाखविण्याचे टाळले आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला एक हजार रुपये दिले असता, फक्त नोटीसचा फोटो काढण्यास त्याने परवानगी दिली.

 

यावेळी दत्तात्रय कदमांनी शेतीच्या मोजणीसाठी इतर शेतकऱ्यांना का नोटीस दिली नाही,
अशी विचारणा अधिकाऱ्याजवळ केली असता, त्याला देखील त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
शेवटी कंटाळून पिता-पुत्रांनी वरिष्ठ अधिकाऱ्याची केबीन गाठली. त्यांनी देखील न चा पाढा गिरवला.
अखेर प्रमोद कदम या सुशिक्षित तरुणाचा बांध फुटला आणि त्याने अधिकाऱ्याला इंग्रजीत प्रश्न विचारुन पळता भुई थोडी केली.

 

तुम्हाला माहिती हवी असल्यास, माहिती अधिकाराचा (Right ot Information) वापर करुन ती मिळवा,
असा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला.
त्यावर संतापलेल्या प्रमोदने लाचखोर अधिकारी यांचा चांगलाच समाचार घेतला.
याप्रकरणी प्रशासनाने देखील आपली बाजू मांडली आहे.
हे सर्व काही गैरसमजुतीने झाल्याचे भूमि अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक नितीन गुरव
(Deputy Superintendent Nitin Gurav) यांनी सांगितले.
लाचखोर आणि कामचुकार अधिकाऱ्यांच्या त्रासाला शेतकरी हतबल झाले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि दत्तात्रय कदम यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Hingoli News | maharashtra hingoli employee asked for bribe of thousand to see notice farmer son answered him in english viral video

 

हे देखील वाचा :

Ambadas Danve | असल्या गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही, अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा

MLA Rohit Pawar | भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचे उत्तर जनता निवडणुकीत देईल – रोहित पवार

Police Memorial Day | पोलीस स्मृतीदिनाचे आयोजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मानवंदना

 

Related Posts