IMPIMP

Ibrahim Ashq | ‘कहोना प्यार है’, ‘क्रिश’, ‘वेलकम’ चित्रपटांचे गीतकार इब्राहिम आश्क यांचे ‘कोरोना’मुळे निधन

by nagesh
Ibrahim Ashq | lyricist ibrahim ashq dies of coronavirus

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) ‘कहो ना प्यार है’ (Kaho Na Pyaar Hai) या शीर्षक गीताचे गीतकार
इब्राहिम आश्क (Ibrahim Ashq) यांचे रविवारी (दि.16) कोरोनामुळे (Corona) मुंबईत निधन (Death) झाले. इब्राहिम आश्क (Ibrahim Ashq)
यांची धाकटी मुलगी मुसफा खान (Musafa Khan) हीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मीरा रोड येथील
हॉस्पिटलमध्ये इब्राहिम आश्क यांचे निधन झाले. इब्राहिम आश्क यांनी आपली कारकिर्द पत्रकार म्हणून सुरु केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अधिक माहिती देताना मुसफा खान म्हणाल्या, शनिवारी सकाळी बाबांना खूप खोकला होता. तसेच रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली. त्यांना आधिच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचा रविवारी मृत्यू झाला.

‘कहोना प्यार है’ व्यतिरिक्त 70 वर्षीय इब्राहिम आश्क यांनी ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘वेलकम’, ‘ऐतबार’, ‘जानशीन’, ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’, ‘बॉम्बे टू बैंकॉक’ अशा अनेक चित्रपटांसाठी इब्राहिम आश्क (Ibrahim Ashq) यांनी गाणी लिहिली आहेत.

 

Web Title : Ibrahim Ashq | lyricist ibrahim ashq dies of coronavirus

 

 

हे देखील वाचा :

Pune Weekend Lockdown | ‘पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar | ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, ‘आदित्य’ हा शब्द मागे घेतो’ – अजित पवारांचं स्पष्टीकरण

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’ची सर्वात जास्त फायदा देणारी योजना! केवळ 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळतील 14 लाखांपेक्षा जास्त

 

Related Posts