IMPIMP

Pune Weekend Lockdown | ‘पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on schools collages to reopen in pune 1st feb

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Weekend Lockdown | पुण्यात दैनंदिन कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढताना
दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कोरोना आढावा
बैठक घेतली. सध्या पुण्यात पहिले होते तेच नियम कायम असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान पुढच्या आठवड्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेता
वीकेंड लॉकडाऊनबाबत (Pune Weekend Lockdown) पुढील शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी स्पष्टंच सांगितले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर पुण्यातील वीकेंड लॉकडाऊनबाबतची देखील माहिती दिली आहे. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमावलीबाबत जो निर्णय घेतला आहे. तोच निर्णय सध्या लागू आहे. हेच आदेश मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तर, त्यांनी याबाबत महापालिकेला कळविले आहे. त्याचे तंतोतंत पालन करणं हे आमचं धोरण आहे. या अनुषंगानं विविध प्रकारची चर्चा झाली. पण या आठवड्यात तरी कुठलाही बदल करु नये असं ठरलं आहे. यानंतर पुढच्या आठवड्यात काय परिस्थिती राहते, हे पाहून आपण येत्या शुक्रवारी जी बैठक होईल त्यामध्ये निर्णय घेऊ,” असं ते म्हणाले. (Pune Weekend Lockdown)

 

 

दरम्यान, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं याबाबत काही नियमावली जाहीर होईल का? या सवालावर बोलताना अजित पवार म्हणाले, ”मुख्यमत्र्यांनी कोरोनाची जी नियमावली ठरवली आहे, तिचं नियमावली सध्या लागू आहे. या नियमावलीनुसार आपण सध्या शाळा बंद ठेवलेल्या आहेत. मुलांना त्रास होऊ नये यासाठी आपण या गोष्टी केल्या आहेत पण जर त्यांच्या पालकांना ऐकायचंच नसेल तर या आठवड्यातील 7 दिवसांची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही काय निर्णय घ्यायचा तो घेऊ” असं देखील पवार यांनी म्हटंल आहे.

 

Web Title :- Pune Weekend Lockdown | coronavirus weekend lockdown in pune to be decided next friday info by ajit pawar Covid-19 News

 

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच, ‘आदित्य’ हा शब्द मागे घेतो’ – अजित पवारांचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | अजित पवारांची 20 लाख खंडणी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Henley Passport Index 2022 | वाढला भारतीय पासपोर्टचा रुतबा ! आता तुम्ही 59 देशात जाऊ शकाल विना व्हिसा

Related Posts